फोटो सौजन्य सोशल मीडिया
सैनिकांच्या हल्ल्यांमुळे या भागातील २२.५ टक्क्यांहून अधिकची शेत जमिनीची वाट लागली असून हजारो शेजाऱ्यांच्या पोटावर पाय येण्याची वेळ आली आहे . एकतर जीव मुठीत घेऊन करावी लागणारी शेती आणि अशातच शेतजमिनीची होणारी नासाडी यामुळे दोन्ही कडून नागरिकांचे बेक्कार हाल होत आहेत .
आणि यावर जगात कोणच बोलायला किंवा इस्रायलला थांबवायला तयार नाहीत . याचबरोबर दक्षिण लेबनॉन मध्ये घरांचे नुकसान झाले आहे . घरे सोडून जाण्याची वेळ आणि हाताला नसलेल्या कायमस्वरूपी कामामुळे लेबनॉन मधील नागरिकांचे जीवन कठीण होऊन बसले आहे . यातील अनेक कुटुंबांचे उत्पन्न हे शेतीवर अवलंबून असल्याने या नुकसानीचे परिणाम दीर्घकाळ जाणवणार आहेत .
दक्षिण लेबनॉन मध्ये ऑलिव्हची शेती हि प्रामुख्याने केली जाणारी शेती आहे . तसेच ही शेती तेथील अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे . मात्र इस्रायली हल्ल्यामुळे अनके ऑलिव्हच्या बागा नष्ट झाल्या आहेत . या अशा प्रकारचे हल्ले हे मुद्दाम केले जातात . लोकांची घरे पाडणे , त्यांचे उपजीविकेचे संसाधन नष्ट करणे ही आजच्या काळातील युद्धाची एक रणनीती झालेली आहे .
ऑलिव्हची झाडे जळणे , शेतजमिनीची हाणी आणि शेतीची कामे ठप्प होणे किंवा करणे यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे . खासकरून ऑलिव्हची झाडे पुन्हा वाढवून उत्पादन घेण्यासाठी अनेक वर्ष लागतात . त्यामुळे झालेले नुकसान लवकर भरून निघणे अत्यंत कठीण काम आहे . आता या अशा संकटावर दक्षिण लेबनॉन मधील नागरिक कसा मार्ग काढतात हे येणाऱ्या पुढील काळात आपल्याला कळेल .
लेबनॉनच्या कृषी मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार , संघर्षग्रस्त दक्षिण भागातील मोठ्या क्षेत्राचे शेतीविषयक नुईकसान झाले आहे . सुमारे ६४ गावांमधील शेतजमीन आणि शेती उत्पादनावर या परिस्थीचा परिणाम झाला आहे . ऑलिव्हसोबतच केळी आणि लिंबूवर्गीय फळांच्या बागांनाही फटका बसल्याचे कळत आहे . याचबरोबर हल्ल्यात शेतीसाठी लागणाऱ्या इतर पायाभूत सुविधांचे सुद्धा तीन तेरा झाले आहेत . सिंचन सुविधाही उध्वस्त झाल्याने तीला पुन्हा सुरु करणे आव्हान आहे .
कधीही हल्ला होण्याची भीती यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतीपर्यन्त जाण्यास भीत आहेत . यामुळे पेरणी , कापणी तसेच इतर शेतीची कामे रखडली आहे . मजूरांचाही रॊजगार हिरावला गेला आहे . युद्ध कधी संपेल सांगता येत नाही त्यामुळे पुन्हा पहिल्यासारखी शेती करणे , बाजारपेठा सुरु करणे आपल्या बागा व्यवस्थित करणे याचबरोबर आपले भविष्य नीट करणे हे प्रश्न आ वाचून नागरिकांसमोर उभे आहेत .






