Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diella : भ्रष्टाचाराविरुद्ध डिजिटल शस्त्र! ‘या’ देशाच्या सरकारने नियुक्त केली जगातील पहिली AI मंत्री, पहा VIDEO

AI minister Diella: प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर वेगाने होत आहे. पण आता AI ने सरकार आणि राजकारणातही प्रवेश केला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अल्बेनियाने आपल्या सरकारमध्ये AI मंत्री नियुक्त केले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 13, 2025 | 01:12 PM
Diella World's first AI minister Albania's new experiment to curb corruption

Diella World's first AI minister Albania's new experiment to curb corruption

Follow Us
Close
Follow Us:
  • अल्बेनियाने जगातील पहिल्या व्हर्च्युअल एआय मंत्री “डिएला” यांची नियुक्ती केली.

  • भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि सरकारी करारांमध्ये १००% पारदर्शकता ठेवण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली.

  • ईयू सदस्यत्वाच्या प्रयत्नांत अल्बेनिया आता भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी एआयवर अवलंबून आहे.

AI minister Diella : आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित राहिलेले नाही. औद्योगिक क्षेत्र, आरोग्यसेवा, शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये AI क्रांती घडवत आहे. मात्र आता राजकारण आणि शासन व्यवस्थेतदेखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) औपचारिक प्रवेश झाला आहे. आणि हा ऐतिहासिक पाऊल टाकणारा पहिला देश ठरला आहे अल्बेनिया. अल्बेनियाने आपल्या कॅबिनेटमध्ये व्हर्च्युअल एआय मंत्री “डिएला” यांची नियुक्ती करून जागतिक स्तरावर नवा आदर्श निर्माण केला आहे. तिच्यावर सर्वात महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे  सरकारी करारांमधील भ्रष्टाचार रोखणे आणि पारदर्शकता सुनिश्चित करणे.

डिएला कोण आहे?

“डिएला” (Diella) हा अल्बेनियन भाषेतला शब्द असून त्याचा अर्थ आहे  “सूर्य”. जानेवारीत ती प्रथम डिजिटल असिस्टंट म्हणून नागरिकांसमोर आणण्यात आली होती. तिचे स्वरूप खास डिझाइन करण्यात आले आहे पारंपरिक अल्बेनियन पोशाख परिधान केलेल्या एका स्त्रीप्रमाणे. सुरुवातीला ती नागरिकांना ई-अल्बेनिया या अधिकृत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मार्गदर्शन करण्याचे काम करत होती. या प्लॅटफॉर्मवरून कागदपत्रे व शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध होतात. डिएलाने आतापर्यंत ३६,६०० डिजिटल कागदपत्रे जारी केली असून सुमारे १,००० सेवा नागरिकांना पुरवल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 50% Tariff : मोदीजी अ‍ॅक्शन मोडमध्ये! ट्रम्पच्या 50% टॅरिफवर करणार पुढचा हल्ला; रशियाचे उपपंतप्रधान करणार भारत दौरा

AI मंत्री म्हणून भूमिका

पंतप्रधान एडी रामा यांनी स्पष्ट केले आहे की, डिएला प्रत्यक्षात संसदेत किंवा मंत्रालयात बसणार नाही. ती पूर्णपणे व्हर्च्युअल स्वरूपात कार्यरत असेल. पण तिचे काम खूप महत्त्वाचे आहे सरकारी करार भ्रष्टाचारमुक्त आहेत याची खात्री करून घेणे. यासाठी डिएलाचा आधार अद्ययावत AI मॉडेल्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आहे. तिच्या माध्यमातून सरकारला १००% पारदर्शकतेने काम करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

#Albania has appointed the world’s first Artificial Intelligence (#AI-generated) government minister with a goal to make the nation corruption-free.

The digital assistant is named ‘Diella’, meaning ‘Sun’ and has been asking people how to navigate government services online… pic.twitter.com/I30ndJQHiU

— All India Radio News (@airnewsalerts) September 12, 2025

credit : social media

अल्बेनियातील भ्रष्टाचार आणि आव्हाने

अल्बेनिया हे गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार, संघटित गुन्हेगारी, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे मुख्य केंद्र म्हणून ओळखले जाते. अनेकदा सरकारी उच्च पदांपर्यंत भ्रष्टाचार पोहोचल्याची उदाहरणे समोर आली आहेत. युरोपियन युनियनचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अल्बेनियाला या समस्यांवर आळा घालणे आवश्यक आहे. कारण EU च्या सदस्यत्वासाठी भ्रष्टाचारावर कठोर नियंत्रण हे एक महत्त्वाचे निकष आहे. त्यामुळेच एआय मंत्र्यांची नियुक्ती हा केवळ तांत्रिक प्रयोग नसून राजकीय गरज आणि आंतरराष्ट्रीय दबावाचा भाग देखील आहे.

Albania introduces world’s first AI government minister, who has been tasked with overseeing public procurement and is designed to be immune to bribery, threats and favouritism pic.twitter.com/n5YJGReYgn

— TRT World Now (@TRTWorldNow) September 12, 2025

credit : social media

संविधान आणि प्रश्नचिन्हे

अल्बेनियाचे राष्ट्रपती बजराम बेगाझ यांना विचारण्यात आले की, एआय मंत्र्यांची नियुक्ती संविधानाला धरून आहे का? मात्र त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. विरोधी पक्षांनी या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रामाच्या सोशालिस्ट पक्षाने सलग चौथ्यांदा सत्ता मिळवली असून १४० पैकी ८३ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांना एकहाती सरकार चालवण्याची ताकद मिळाली आहे. मात्र संविधानात बदल करण्यासाठी ९३ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे AI मंत्रीबाबत भविष्यात कायदेशीर प्रश्न उभे राहू शकतात.

अल्बेनियाचे युरोपियन युनियन स्वप्न

सोशालिस्ट पक्षाने जाहीर केले आहे की पुढील ५ वर्षांत अल्बेनियाला युरोपियन युनियनचे सदस्यत्व मिळवून देतील. ही प्रक्रिया २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पण विरोधी पक्षांचे मत आहे की देश अद्याप त्यासाठी तयार नाही. मात्र भ्रष्टाचारविरोधी कारवाई व AI मंत्री डिएलाची नियुक्ती ही पावले EU सदस्यत्वासाठी विश्वासार्हता मिळवण्याचा भाग मानली जात आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Modi : ‘भारतावर टॅरिफ लावा…’, इकडे पंतप्रधान मोदींना खास मित्र म्हणून ट्रम्पने G-7 देशांना भारताविरुद्ध भडकवले

जगासाठी नवा संदेश

जगभर भ्रष्टाचार आणि पारदर्शकतेबाबतचे प्रश्न गंभीर आहेत. अनेक देशांमध्ये मोठमोठे घोटाळे उघड होत असतात. अशा वेळी अल्बेनियाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. डिएला हा फक्त एआय मंत्री नाही तर भ्रष्टाचारविरहित भविष्याचा प्रतीक ठरू शकतो. जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर भविष्यात इतर देश देखील सरकारमध्ये AI चा समावेश करण्याबाबत गंभीरपणे विचार करू शकतात.

Web Title: Worlds first ai minister albanias new experiment to curb corruption

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • AI technology
  • Artificial intelligence
  • Digital news
  • International Political news

संबंधित बातम्या

Trump Modi : ‘भारतावर टॅरिफ लावा…’, इकडे पंतप्रधान मोदींना खास मित्र म्हणून ट्रम्पने G-7 देशांना भारताविरुद्ध भडकवले
1

Trump Modi : ‘भारतावर टॅरिफ लावा…’, इकडे पंतप्रधान मोदींना खास मित्र म्हणून ट्रम्पने G-7 देशांना भारताविरुद्ध भडकवले

Gemini Retro Trend: केवळ फोटो अपलोड करा आणि बनवा तुमचा आवडता Trending रेट्रो स्टाईल लूक, हा आहे Prompt
2

Gemini Retro Trend: केवळ फोटो अपलोड करा आणि बनवा तुमचा आवडता Trending रेट्रो स्टाईल लूक, हा आहे Prompt

Shahbaz In Doha : इस्रायली हवाई हल्ल्यानंतर दोहाला पोहोचले शाहबाज; पाकिस्तान-कतार संबंधांबाबत ‘मोठी’ घोषणा
3

Shahbaz In Doha : इस्रायली हवाई हल्ल्यानंतर दोहाला पोहोचले शाहबाज; पाकिस्तान-कतार संबंधांबाबत ‘मोठी’ घोषणा

NATO Article 4 : सीमेवर 40 हजार सैनिक तैनात, मोठ्या आपत्तीचे संकेत; रशिया-पोलंड वादामुळे आंतरराष्ट्रीय तणाव तीव्र
4

NATO Article 4 : सीमेवर 40 हजार सैनिक तैनात, मोठ्या आपत्तीचे संकेत; रशिया-पोलंड वादामुळे आंतरराष्ट्रीय तणाव तीव्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.