Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Afghanistan-Pakistan Attack: मक्का करारातून पळ काढण्यासाठी पाकिस्तानचे युद्ध; तालिबानच्या झबिहुल्ला मुजाहिद यांचा गंभीर आरोप

Afghanistan-Pakistan Attack : मुजाहिद म्हणाले, "सौदी अरेबियासोबतचा मक्का करार टाळण्यासाठी आणि पाकिस्तान अफगाणिस्तानमधील युद्धात गुंतले आहे असे चित्र निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर अलीकडे हल्ले केले आहेत."

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 25, 2026 | 04:30 PM
Zabihullah Mujahid Pakistan Statement Pakistan Afghanistan Airstrike

Zabihullah Mujahid Pakistan Statement Pakistan Afghanistan Airstrike

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानवर गंभीर आरोप
  • हवाई हल्ले आणि नागरिक ठार
  • इस्लामाबादचा प्रत्युत्तर दावा

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Afghanistan-Pakistan Attack) यांच्यातील राजनैतिक व लष्करी तणाव अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. तालिबान सरकारचे मुख्य प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी पाकिस्तानवर अत्यंत गंभीर आरोप करत इस्लामाबाद जाणीवपूर्वक अफगाणिस्तानसोबत युद्धाची परिस्थिती निर्माण करत असल्याचा दावा केला आहे. गुरुवारी अफगाणिस्तानमधील कंदहार येथे एका धार्मिक मदरशाच्या कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना मुजाहिद यांनी पाकिस्तानच्या लष्करी धोरणांवर सडकून टीका केली.

झबिहुल्ला मुजाहिद म्हणाले की, पाकिस्तान आंतरराष्ट्रीय करारांतर्गत असलेल्या आपल्या वचनबद्धतेपासून पळ काढण्यासाठी सीमेवर द्वेष आणि युद्धाचे वातावरण भडकवत आहे. विशेषतः सौदी अरेबियासोबतच्या ‘मक्का करारातील’ अटी आणि जबाबदाऱ्या टाळण्यासाठीच पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये लष्करी कारवाया करत असल्याचे चित्र आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करत आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

अंतर्गत अपयश झाकण्यासाठी पाकिस्तानचा ‘खेळ’

आपल्या भाषणात तालिबान प्रवक्त्याने आरोप केला की, पाकिस्तान वारंवार अफगाणिस्तानच्या सीमेवर लष्करी हल्ले करून एक राजकीय व रणनीतिक खेळ खेळत आहे. सध्या पाकिस्तानमध्ये राजकीय, आर्थिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या देशांतर्गत गंभीर समस्यांवरून आणि नागरिकांच्या असंतोषावरून स्वतःचे लक्ष विचलित करण्यासामुजाहिद म्हणाले, “सौदी अरेबियासोबतचा मक्का करार टाळण्यासाठी आणि पाकिस्तान अफगाणिस्तानमधील युद्धात गुंतले आहे असे चित्र निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने अफगाणिस्तानवर अलीकडे हल्ले केले आहेत.”
ठीच पाकिस्तानी लष्कर अफगाण भूभागाला लक्ष्य करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

कंदहार, पक्तिया आणि खोस्त या प्रांतांमध्ये पाकिस्तानने नुकतेच भीषण हवाई आणि ड्रोन हल्ले केले आहेत. अफगाण अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या हवाई हल्ल्यांमध्ये निष्पाप चार अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कंदहार हा भाग तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याचा मुख्य बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या भागात झालेल्या हल्ल्यांमुळे तालिबान प्रशासनामध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Biofouling : मुंबई आणि सिंगापूर बंदरांना अलर्ट; अडकलेल्या जहाजांमार्फत प्राणघातक आक्रमक प्रजाती जगभर पसरणार

पाकिस्तानचे स्पष्टीकरण आणि सुरक्षेचे कारण

दुसरीकडे, पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांनी आणि लष्करी सूत्रांनी या हल्ल्यांचे समर्थन करत इस्लामाबादची बाजू मांडली आहे. पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानमधील १० वेगवेगळ्या लष्करी व दहशतवादी लक्ष्यांवर अत्यंत अचूक हल्ले केले आहेत. जरी पाकिस्तानने सर्व १० लक्ष्यांची सविस्तर माहिती उघड केली नसली, तरी अफगाणिस्तानच्या भूमीवरून पाकिस्तानविरोधी दहशतवादी कारवाया चालवल्या जात असल्याचा पुनरुच्चार इस्लामाबादने केला आहे.

पाकिस्तानचा दावा आहे की, अफगाण भूभागाचा वापर करून पाकिस्तानच्या हद्दीत सलग दहशतवादी हल्ले आणि ड्रोनद्वारे आक्रमणे केली जात आहेत. आपल्या देशाची अखंडता आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे प्रतिहल्ले करणे अनिवार्य होते, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. मात्र, काबूलमधील तालिबान सरकारने पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळून लावले असून आपल्या भूमीवरून कोणत्याही देशाला धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे दक्षिण आशियातील या दोन शेजारी देशांमधील तणाव शिगेला पोहोचला असून प्रादेशिक शांततेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

Web Title: Zabihullah mujahid accuses pakistan over airstrikes in kandahar afghanistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Afghanistan-Pakistan Attack

संबंधित बातम्या

Pakistan airstrikes : पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 4 निष्पाप अफगाण नागरिक ठार, तालिबानने केला ‘असा’ मोठा दावा
1

Pakistan airstrikes : पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 4 निष्पाप अफगाण नागरिक ठार, तालिबानने केला ‘असा’ मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.