फोटो सौजन्य- सोशल मीडिया
वाहनाबाबत अनेक जण खूप भावनिक असतात. प्रत्येकाचे आपल्या वाहनासोबत एक वेगळे नाते असते. हे नाते अधोरेखित करणारी एक विलक्षण घटना गुजरातमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. गुजरातमधील एका कुटुंबाने आपल्या कारला निरोप दिला. त्यावेळी त्या कारवर अंत्यसंस्कार पार पाडले आणि तेथील तब्बल 1500 लोकांना जेवण दिले गेले.
गुजरातमधील अमरेली येथे एका व्यक्तीने आपल्या 12 वर्ष जुन्या कारला हिंदू विधींसह निरोप दिला. अमरेलीचे रहिवासी असलेल्या संजय पोलारा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या कारवरील अत्यंसंस्कार प्रसंगी तब्बल 1500 लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. या कारचा मालक संजय म्हणाले त्यांच्या या मारुती सुझुकी वॅगनआर कारमुळे त्यांचे आयुष्य बदलेल ही कार त्यांच्यासाठी लकी होती त्यामुळे त्यांनी अशाप्रकारे आपल्या कारला निरोप दिला.
कार को दी अंतिम विदाई
गुजरात के अमरेली में एक परिवार ने अपनी 12 साल पुरानी लकी वैगन आर कार को बेचा नहीं बल्कि अपने ही खेत में उसकी समाधि दे दी. आप ने किसी संत, महंत,पीर बाबा की तो समाधि लेने की खबरें सुनी होंगी लेकिन कार को समाधि देने का शायद ये पहला अनोखा मामला है. pic.twitter.com/UmNgHXzDsm
— जितेन्र्द यादव- बस्ती (@Mrjitendrasp) November 11, 2024
संजय पोलारा यांनी 2012 मध्ये ही मारुती सुझुकी वॅगनआर खरेदी केली. या कारच्या आगमनाने त्यांचा बांधकाम व्यवसाय वाढला त्यांची प्रगती झाली त्यामुळे ही कार त्यांच्या कुटुंबासाठी समृद्धीचे प्रतीक बनली आहे. त्यामुळे ही कार त्यांच्याकरिता अनमोल होती तिच्या आठवणींसाठीच या कारला जमिनीमध्ये पुरण्याचा निर्णय घेतला.
या कारच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोल खड्डा खणला आहे. त्यानंतर ही कार संपुर्णपणे फुलांनी सजवली आली आहे त्यावर मंत्रोच्चार केले गेले आणि ही कार खड्यात उतरवली आहे. त्याठिकाणी असंख्य लोक उभे आहेत. यानंतर या कारला जमिनीमध्ये पुरण्यात आले.
कारच्या स्मरणार्थ केले जाणार वृक्षारोपण
ज्याठिकाणी ही कार पुरण्यात आली त्या ठिकणी एक झाड लावण्याचाही विचार संजय करत आहेत, जेणेकरून ती जागा आणि कार कायम लक्षात राहिल. प्रिय कारच्या निरोप समारंभासाठी त्यांनी 4 लाख रुपये खर्च करत तेथील 1500 लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती.
या घटनेमुळे व्यक्ती प्राणीमात्रांवर माणसाचे प्रेम जडते तसेच अनेक भौतिक वस्तूंबाबतही माणूस हळवा भावनिक असतो हे दाखवून दिले.