Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti च्या ‘या’ कारने ग्राहकांना पाडली भुरळ, तब्बल 30 लाख युनिट्सची विक्री करत तोडले रेकॉर्ड्स

मारुती सुझुकीच्या अनेक कार्स मार्केटमध्ये लोकप्रिय आहेत. यातील एका कारने तर विक्रीचे रेकॉर्डस् सुद्धा तोडले आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 30, 2024 | 05:18 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

देशात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार दमदार कार्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. ग्राहकांची मागणी लक्षात घेतल्यामुळे या कार्सना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. देशात अनेक वर्षांपासून मारुती सुझुकी उत्तम कार्स ऑफर करत आहे. उत्तम मायलेज, आणि बजेट फ्रेंडली कार्स ऑफर करण्यासाठी कंपनी ओळखली जाते. आता कंपनीच्या एका कारने विक्रीची रेकॉर्डस् तोडले आहे.

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने नवीन वर्षाच्या आधी विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे ज्यानुसार डिझायर सेडानसाठी 3 मिलियन युनिट्स विकल्या गेल्या आहेत. कंपनीला ही महत्त्वाची कामगिरी साधारणत: 16 वर्षे 11 महिन्यांत मिळाली आहे. यापूर्वी, Dzire ने एप्रिल 2015 मध्ये 1 मिलियन युनिट्सचे उत्पादन केले होते आणि जून 2019 मध्ये 2 मिलियन युनिट्सचे उत्पादन गाठले होते. 3 मिलियन उत्पादनाचा टप्पा गाठणाऱ्या कंपनीच्या मॉडेल्समध्ये अल्टो, स्विफ्ट आणि वॅगनआर यांचा समावेश आहे.

Year Ender 2024: यावर्षी ‘या’ बाईक्सने मार्केटला केले टाटा बाय बाय, आता दिसणार सुद्धा नाहीत

अन्य व्हेरियंट्सची किंमत किती?

पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंट LXi साठी ₹6.79 लाख, VXi साठी ₹7.79 लाख, ZXi साठी ₹8.89 लाख आणि ZXi Plus साठी ₹9.69 लाख पासून सुरू होतात. ऑटोमेटेड गिअर शिफ्ट (AGS) व्हेरियंटची किंमत VXi साठी ₹ 8.24 लाख, ZXi साठी ₹ 9.34 लाख आणि ZXi Plus साठी ₹ 10.14 लाख आहे. CNG ऑप्शनसाठी, VXI CNG ची किंमत ₹8.74 लाख आहे आणि ZXI CNG ची किंमत ₹9.84 लाख आहे. या सर्व किंमती इंट्रोडक्टरी किंमती आहेत ज्या 31 डिसेंबर 2024 पर्यंत व्हॅलिड आहेत.

या फीचर्सने आहे सुसज्ज

2024 Dzire मध्ये मोठ्या फ्रंट ग्रील, LED डेटाइम रनिंग लाइट्स, Y-आकाराचे LED टेल लॅम्प आणि 15-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हीलसह आकर्षक डिझाइन आहे. या कारमध्ये डायमेन्शन समान राहतील, लांबी 3,995 मिमी, रुंदी 1,735 मिमी, उंची 1,525 मिमी, व्हीलबेस 2,450 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स 163 मिमी आणि बूट स्पेस 382 लिटर आहे.

फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि Maruti Alto K10 CNG व्हेरियंट कार तुमची, भरावा लागेल इतका EMI

ग्राहकांच्या सेफ्टी विशेष लक्ष

सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, नवीन Dzire मध्ये मजबूत स्टॅंडर्ड सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहे. या कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि पादचारी संरक्षण समाविष्ट आहे. याशिवाय या कारला ग्लोबल एनसीएपी टेस्टिंगमध्ये 5 स्टार रेटिंग देखील मिळाले आहे. त्यामळे जेव्हा सुरक्षित ड्राईव्हची गोष्ट येते तेव्हा ग्राहक मारुती सुझुकीच्या नवीन डिझायरला पहिले प्राधान्य देताना दिसतात.

Web Title: 30 million units of maruti dzire has been sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 04:27 PM

Topics:  

  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

‘या’ Hybrid Car ची इतर मॉडेल्सना धडकी! फुल टॅंकवर 1200 किमी अंतर करते पार आणि मायलेज एकदम दमदार
1

‘या’ Hybrid Car ची इतर मॉडेल्सना धडकी! फुल टॅंकवर 1200 किमी अंतर करते पार आणि मायलेज एकदम दमदार

2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल Maruti Suzuki Ignis चा EMI? जाणून घ्या सोपा हिशोब
2

2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल Maruti Suzuki Ignis चा EMI? जाणून घ्या सोपा हिशोब

विदेशात Made In India SUVs ठरल्या ब्लॉकबस्टर! ‘या’ ऑटो कंपनीचा मार्केट शेअर 47 टक्क्यांपेक्षा जास्त
3

विदेशात Made In India SUVs ठरल्या ब्लॉकबस्टर! ‘या’ ऑटो कंपनीचा मार्केट शेअर 47 टक्क्यांपेक्षा जास्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.