फोटो सौजन्य: @nocarcontext (X.com)
भारतातील मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये Kia Seltos ही एक अतिशय लोकप्रिय कार आहे. ही एसयूव्ही तिच्या स्टायलिश डिझाइन, फीचर्स आणि परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. आता कंपनीने त्यात अनेक अपडेट्स करण्यात आले आहेत आणि आता ही एसयूव्ही Hyundai Creta आणि Maruti Grand Vitara सारख्या कारला जोरदार टक्कर देत आहे. अशातच जर तुम्ही ही कार खरेदी करण्याची प्लॅनिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला या कारची किंमत किती ते पाहिलं जाणून घेऊयात.
2025 Kia Seltos ची एक्स-शोरूम किंमत राजधानी दिल्लीमध्ये 11.19 लाख रुपयांपासून सुरू होते आणि याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 20.56 लाख रुपयांपर्यंत जाते. याचा बेस व्हेरिएंट HTE 1.5 पेट्रोल एमटीची किंमत 11.19 लाख रुपये आहे, तर HTX IVT नावाचा ऑटोमॅटिक पेट्रोल व्हेरिएंट 15.82 लाख रुपयांना येतो.
या कारच्या डिझेल इंजिनच्या बेस मॉडेलची किंमत 12.77 लाख रुपये आहे, तर डिझेल ऑटोमॅटिक व्हेरिएंट 17.28 लाख रुपयांना उपलब्ध आहे. याचा टॉप व्हेरिएंट X-Line 1.5 Turbo Petrol DCT ची किंमत 20.56 लाख रुपये आहे. लक्षात घ्या, जेव्हा ऑन-रोड किमतीचा विचार केला जातो तेव्हा RTO चार्जेस आणि विमा प्रीमियम सारख्या अतिरिक्त शुल्कामुळे एकूण खर्च आणखी वाढतो.
जर तुम्हाला Kia Seltos चा HTE (O) 1.5 पेट्रोल MT व्हेरिएंट दिल्लीमध्ये खरेदी करायचा असेल, तर त्याची ऑन-रोड किंमत सुमारे 13 लाख रुपये असेल. जा तुम्ही या कारसाठी 2 लाख रुपये डाउन पेमेंट केले तर तुम्हाला उर्वरित 11 लाख रुपयांसाठी कार लोन घ्यावे लागेल. जर हे लोन 5 वर्षांसाठी म्हणजेच 60 महिन्यांसाठी 9 टक्के अंदाजे व्याजदराने घेतले असेल, तर तुमचा महिन्याचा EMI सुमारे 22,000 असेल. कोणत्याही अडचणीशिवाय हा EMI परतफेड करण्यासाठी, तुमचा मासिक पगार किमान 50,000 किंवा त्याहून अधिक असावा.
किया सेल्टोस तीन वेगवेगळ्या इंजिन पर्यायांसह मार्केटमध्ये उपलब्ध आहे, जे परफॉर्मन्स आणि इंधन कार्यक्षमता दोन्हीचे उत्तम कॉम्बिनेशन देतात. त्याचे 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन सुमारे 17 ते 17.9 किमी प्रति लिटर मायलेज देते. याशिवाय, 1.5-लिटर डिझेल इंजिन 19.1 ते 20.7 किमी प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे.