फोटो सौजन्य: Social Media
ग्रामीण भाग असो की शहरी, आता प्रत्येक भागात स्कूटरची मागणी वाढताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेता अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या स्कूटर मार्केटमध्ये आणत आहे. भारतीय ग्राहक जेव्हा स्कूटर निवडत असतात, तेव्हा त्याच्यामध्ये अनेक गोष्टी पाहत असतात. त्यातीलच एक म्हणजे स्कूटरची पॉवर आणि फीचर्स. जर अशा गोष्टींवर स्कूटर उत्पादक कंपन्यांनी विशेष लक्ष दिले तर नक्कीच त्यांच्या स्कूटरची विक्री वाढायला लागते.
भारतात अनेक अशा उत्तम स्कूटर आहेत, ज्या काही वर्षांआधी मार्केटमध्ये आल्या आहेत, पण आजही ग्राहक याच स्कूटर खरेदी करत आहे. अशाच एका स्कूटरने मिलियनमध्ये उत्पादनाचा टप्पा गाठला आहे. ही स्कूटर सुझुकी कंपनीची असून 2006 सालापासून कार्यरत आहे. चला या स्कूटरबद्दल जाणून घेऊया.
मध्यम वर्गीय लोकांना परवडणारी कार उपलब्ध करून देणाऱ्या Osamu Suzuki यांचे निधन
सुझुकी मोटरसायकल इंडियाने एक नवा टप्पा गाठला आहे. ऑटोमेकर्समधील सर्वात लोकप्रिय स्कूटरपैकी एक, Access 125 ने 6 मिलियन उत्पादनाचा टप्पा गाठला आहे. ही स्कूटर गेल्या 18 वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत आहे. या जपानी टू-व्हीलर सेगमेंटची ही सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. ही स्कूटर 2006 मध्ये भारतीय बाजारात विक्रीसाठी आली होती. तेव्हापासून आतापर्यंत 60 लाख युनिट्सचे उत्पादन झाले आहे.
Suzuki Access ही 125 cc स्कूटर आहे. ऑटोमेकर्सची ही स्कूटर स्मूद परफॉर्मन्स, उत्तम मायलेज आणि कमी किंमतीसाठी ओळखली जाते. बाजारात अशा अनेक स्कूटर आहेत ज्या सुझुकी ऍक्सेस 125 सोबत स्पर्धा करतात. Honda Activa 125, Aprilia SXR 125 आणि Vespa VXL सारख्या प्रतिस्पर्धी स्कूटरचाही भारतीय बाजारात समावेश आहे.
Suzuki Access 125 मध्ये एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. स्कूटरमध्ये बसवलेले हे इंजिन 6,750 rpm वर 8.58 bhp ची पॉवर देते आणि 5,500 rpm वर 10 Nm टॉर्क जनरेट करते. ही स्कूटर सुझुकी इको परफॉर्मन्स (SEP) तंत्रज्ञानासह येते. या सुझुकी स्कूटरमध्ये समोरच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेकची कॉम्बी-ब्रेकिंग सिसम आहे.
मुंबईच्या कोस्टल रोडवर Lamborghini ने घेतला पेट, 9 कोटी किंमतीच्या कारमध्ये सुद्धा सेफ्टी नाही का?
Suzuki Access 125 चे अपडेटेड मॉडेल Ride Connect Edition आहे, ज्यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल ब्लूटूथने जोडलेले आहे. यासोबतच यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, इनकमिंग कॉल रिसिव्ह करणे, एसएमएस आणि व्हॉट्सॲप अलर्टची सुविधाही आहे. या स्कूटरच्या कन्सोलवर मिस्ड कॉल्स आणि न वाचलेल्या संदेशांचे अलर्टही उपलब्ध आहेत. या सुझुकी स्कूटरमध्ये 22.3 लीटर अंडर-सीट स्टोरेज स्पेस देखील आहे. या स्कूटरची सीट लांब आहे. ते सहज सुरू करता येते.