फोटो सौजन्य: @sagarcasm (X.com)
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार आहेत, ज्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज आपण अशाच एका कारबद्दल जाणून घेऊयात, जिच्या विक्रीत वाढच होत चालली आहे.
भारतात दिवसेंदिवस कार्सच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत आहे. ग्राहकांची हीच वाढती मागणी, अनेक ऑटो कंपन्यांना अजून चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार लाँच करण्यास प्रेरित करीत आहे. भारतात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. टाटा मोटर्स ही त्यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी.
भारतीय मार्केटमध्ये टाटा मोटर्सच्या कार्सना खूप पसंती मिळते. त्यामुळेच कार्सची मागणी खूप जास्त आहे. यात कंपनीची एंट्री लेव्हल टियागो हॅचबॅक बाजारात धुमाकूळ घालत आहे. ही कार किफायतशीर असण्यासोबतच मजबूत सेफ्टी आणि सीएनजी इंजिनसह येते. गेल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात 6 हजारांहून अधिक ग्राहकांनी टियागो खरेदी केली आहे. देशांतर्गत बाजारात या कारने मारुती Wagon R आणि Hyundai Grand i10 Nios शी स्पर्धा करते. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
अपमानातून Rolls-Royce ला घडवली अद्दल ! ‘या’ व्यक्तीने कंपनीच्या कारला बनवले होते कचऱ्याची गाडी
गेल्या महिन्यात म्हणजेच मे 2025 मध्ये एकूण 6 हजार 407 नवीन ग्राहकांनी टाटा टियागो खरेदी केली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा विक्रीत 8 टक्क्यांची अधिक वाढ झाली आहे. हे आकडे टियागो ICE आणि EV दोन्हीसाठी आहेत.
टाटा टियागोची सुरुवातीची किंमत 5 लाख रुपये आहे, जे टॉप एंड व्हेरियंटसाठी 8.45 लाख रुपयांपर्यंत एक्स-शोरूम आहे. टियागो 12 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. टियागोमध्ये 1199 सीसी 1.2-लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन आहे. कारमधील हे इंजिन 6,000 आरपीएमवर 86 पीएस पॉवर आणि 3,300 आरपीएमवर 113 एनएम टॉर्क देते.
टाटा टियागो सीएनजी पर्यायात देखील उपलब्ध आहे. टियागो सीएनजीमधील इंजिन 6,000 आरपीएमवर 75.5 पीएस पॉवर आणि 3,500 आरपीएमवर 96.5 एनएम टॉर्क देते. ही कार 242 लिटरच्या बूट-स्पेससह येते. टाटा टियागोचा ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी आहे. या टाटा कारच्या समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला ड्रम ब्रेक आहेत.
KTM ने सादर केली Toyota Fortuner च्या किमतीची बाईक, फक्त 100 युनिट्सची होणार विक्री
टाटा टियागोचा पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंट 20.09 किमी प्रति लिटर मायलेज देतो. त्याच वेळी, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली ही टाटा कार 19 किमी प्रति लिटर मायलेज देते. यासोबतच, टाटा टियागो कार सीएनजी मोडमध्ये चांगले मायलेज देते.
जर तुम्ही दोन्ही फ्युएल टॅंक भरले तर सहजपणे तुम्ही 900 किमी पर्यंत प्रवास करू शकता. टियागो सीएनजी मॅन्युअल ट्रान्समिशनसह 26.49 किमी/किलो आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 28.06 किमी/किलो मायलेज देते.