Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हळदीत होणार जल्लोष! ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाण्यावर थिरकणार महाराष्ट्र; ललित-विदुलाची केमिस्ट्री कमाल

'सुपर डुपर' हा आगामी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच या चित्रपटामधील नवीन गाणं ‘नाचा दणाना’ प्रदर्शित झालं आहे. ज्याची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसून येत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 19, 2026 | 11:55 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘सुपर डुपर’ मधील ‘नाचा दणाना’ गाणं प्रदर्शित
  • ललित-विदुलाची दिसली कमाल केमिस्ट्री
  • ‘सुपर डुपर’ कधी होणार प्रदर्शित?
 

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील ‘नाचा दणाना’ हे गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. हळदी समारंभाच्या पार्श्वभूमीवर साकारलेले हे गाणे धमाल संगीत, भव्य सेट्स आणि उत्साहाने भरलेल्या सादरीकरणामुळे हे गाणं ऐकल्याबरोबरच प्रेक्षकांना थिरकायला भाग पडेल हे नक्की.

या गाण्यात ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांची जोडी विशेष सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या जोडीला ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके आणि प्रतीक्षा कोते या दमदार कलाकारांची साथ लाभली आहे. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन साजरा करत असलेला आनंद, रंगतदार नृत्यरचना आणि आकर्षक वेशभूषा यामुळे गाण्याला वेगळीच रंगत मिळाली आहे.

सलमान खानचे वडील सलीम खान… तर सलीम खान यांचे वडील कोण? ब्रिटिश सरकारमध्ये केले महत्वाचे काम

दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी लिहिलेल्या गाण्याला अभिनव जगताप यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. तर आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने गाण्यात अफलातून ऊर्जा आणली आहे. ‘कौटुंबिक महासोहळा’ ही चित्रपटाची टॅगलाईन असल्याने ‘नाचा दणाना’मध्ये नात्यांमधला जिव्हाळा, एकत्र येण्याचा आनंद आणि कुटुंबातील बंध अधिक ठळकपणे जाणवत आहेत.

 

विशेष म्हणजे, गाण्यातील हुक स्टेप प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून ती लवकरच ट्रेंडिंग होण्याची चिन्हे आहेत. लग्नसमारंभ आणि हळदी कार्यक्रमांमध्ये हे गाणे हमखास वाजणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित तसेच समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘सुपर डुपर’ हा चित्रपट येत्या ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘enough- enough- enough’ म्हणत जया बच्चनने पुन्हा पापाराझींना फटकारले; करण जोहरने दिला पाठिंबा, चाहत्यांनी केले कौतुक

विजय शिंदे आणि नरेश बोर्डे हे चित्रपटाचे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. धमाल गाणी, रंगतदार कलाकार आणि कुटुंबाचा जल्लोष यांचा संगम असलेला ‘नाचा दणाना’ सध्या प्रेक्षकांच्या प्लेलिस्टवर अधिराज्य गाजवत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आणि त्याची कथा जाणून घेण्यासाठी छते उत्सुक आहेत.

Web Title: Super duper marathi movie new song nacha danana released lalit prabhakar and vidula chougule special dance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
1

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव
2

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय
3

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट
4

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.