Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सनरूफ असणाऱ्या कारची मार्केटमध्ये वेगळीच क्रेझ, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

काही वेळेपासून मार्केटमध्ये सनरूफ असणाऱ्या कारला चांगली मागणी मिळत आहे. जर तुम्ही सुद्धा सनरूफ असणाऱ्या कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 08, 2025 | 05:10 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

भारतीय बाजारात अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून बेस्ट कार ऑफर केल्या जातात. आता काळानुसार ग्राहकांच्या मागणीत बदल होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे ऑटो कंपन्या देखील आपल्या कारमध्ये विविध बदल घडवून आणत आहे. यातीलच एक बदल म्हणजे हल्लीच्या कारमध्ये दिसणारे सनरूफ.

आज अनेक ऑटो कंपन्या आपल्या नवीन कारमध्ये सनरूफ समाविष्ट करत आहे. तसेच ग्राहकांना देखील अशा कार आवडत आहे. लोकांमध्ये सनरूफ कारची क्रेझ वाढत आहे, म्हणूनच तर वाहन उत्पादक कंपन्यांनी आता त्यांच्या छोट्या कारमध्ये सनरूफ देण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. अलिकडच्या काळात, ही वाहने रस्त्यांवर आकर्षणाचे केंद्र बनली आहेत. हे लक्षात घेऊनच, आज आपण सनरूफ असलेल्या कारचे फायदे आणि तोट्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

सनरूफ असणाऱ्या कारचे फायदे

  • जेव्हा कारमध्ये सनरूफ असते तेव्हा आतील वातावरण अधिक मोकळे आणि ताजेतवाने वाटते. तसेच सकाळच्या सूर्यप्रकाशाचा आनंद घेता येतो.
  • जर कारमध्ये सनरूफ असेल तर तुम्ही सूर्यास्त आणि सूर्योदय सहज पाहू शकता. अशा गोष्टी तुमच्या ड्राईव्हला आणखी खास बनवतात आणि तुम्हाला ताजेतवाने वाटते.
  • सनरूफ असलेल्या कार भरपूर नैसर्गिक प्रकाश देतात, ज्यामुळे केबिनमध्ये एक आल्हाददायक वातावरण निर्माण होते.
  • चांगल्या हवामानात कारमध्ये सनरूफ असल्याने एसी चालवण्याची गरज कमी होते आणि तुम्हाला ताजी हवा देखील मिळते.
  • सनरूफ असलेल्या कारमध्ये तुम्ही मोकळ्या आकाशाचा आनंद घेऊ शकता.
  • जर काही कारणास्तव तुमच्या कारचे दरवाजे लॉक झाले तर तुम्ही सनरूफमधून बाहेर पडू शकता.
  • रात्री प्रवास करताना, तुम्ही आकाशातील तारे आणि चंद्र पाहत प्रवास करू शकता, जो एक अद्भुत अनुभव देतो.

सनरूफ असणाऱ्या कारचे तोटे

  • सनरूफ असलेल्या कार सनरूफ नसलेल्या कारपेक्षा खूपच महाग असतात. हा अतिरिक्त खर्च तुम्हाला कारच्या किमतीत वाढ होण्याच्या स्वरूपात दिसेल.
  • जर सनरूफ व्यवस्थित बंद केला नाही तर पावसाचे पाणी कारमध्ये शिरू शकते. यामुळे कार आतून ओली होऊ शकते आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होऊ शकते.
  • उन्हाळ्याच्या हंगामात, जर तुम्ही दुपारी कार चालवत असाल आणि सनरूफ उघडा असेल, तर कारच्या आत उष्णता वाढू शकते. यामुळे तुम्हाला सूर्यप्रकाशाचा त्रास देखील होऊ शकतो.
  • टक्कर किंवा अपघात झाल्यास सनरूफ असलेली कार अधिक धोकादायक ठरू शकते. काही परिस्थितींमध्ये, सनरूफ उघडल्याने कारच्या आत धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
  • सनरूफ असलेल्या कारला नियमित देखभालीची आवश्यकता असते. यामध्ये सनरूफ तुटणे, घाण साचणे यासारख्या समस्या असू शकतात.
  • जर तुम्ही सनरूफ उघडला आणि त्यातून डोके बाहेर काढून उभे राहिलात तर तुम्ही अनेक समस्यांना आमंत्रण देत आहात.

Web Title: Advantages and disadvantages of sunroof cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स आहे? तुमच्या पाल्याला मिळू शकते श्रीराम फायनान्सची स्कॉलरशिप! अर्ज करा या सोप्या पद्धतीने!
1

कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स आहे? तुमच्या पाल्याला मिळू शकते श्रीराम फायनान्सची स्कॉलरशिप! अर्ज करा या सोप्या पद्धतीने!

TVS ने Honda ला टाकले मागे! जुलै २०२६ मध्ये स्कूटर विक्रीत प्रथमच घडला हा विक्रम!
2

TVS ने Honda ला टाकले मागे! जुलै २०२६ मध्ये स्कूटर विक्रीत प्रथमच घडला हा विक्रम!

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच
3

Kia Sorento: किया सोरेंटो हायब्रिडचे प्रोडक्शन अनंतपूरमध्ये सुरू; लवकरच भारतीय मार्केटमध्ये होणार लाँच

महिंद्रा XEV 9e आता मार्केटमध्ये येणार ६-सीटर अवतारात! पाहा काय आहेत खास फीचर्स आणि इंटेरियर!
4

महिंद्रा XEV 9e आता मार्केटमध्ये येणार ६-सीटर अवतारात! पाहा काय आहेत खास फीचर्स आणि इंटेरियर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.