फोेटो सोैजन्य: iStock
आपली स्वतःची कार असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हल्ली हे स्वप्न ईएमआयच्या मदतीने अनेक जण पूर्ण करू शकतात. तसेच मार्केटमध्ये अनेक उत्तम फीचर्स असणाऱ्या दमदार कार्स देखील लाँच होत आहे ज्या ग्राहकांना आकर्षित करत आहे. परंतु कार विकत घेतल्यानंतर समजते की तिला मेंटेन ठेवणे हे तिला विकत घेण्यापेक्षा सुद्धा महाग आहे.
कार मेंटेन ठेवताना अनेक गोष्टींवर लक्ष दिले गेले पाहिजे. यातीलच एक गोष्ट म्हणजे कारचे टायर. कार जुनी व्हायला लागल्यानंतर अनेक जण कारमधील पार्ट्स बदलतात, त्याचप्रमाणे ते कारचे टायर देखील बदलतात का?
जास्त कार चालकांचे लक्ष टायरच्या लाइफवर नसतेच. बहुतेक कार चालक टायर फुटल्यावरच त्यांच्या कारमध्ये नवीन टायर बसवतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. वास्तविक, कारच्या टायर्सची सुद्धा एक लाइफ असते आणि जर ते वयापेक्षा जास्त वापरले गेले तर ते खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे तुमची कार अपघाताला बळी पडू शकते. जर तुम्ही अजूनही याविषयी अनभिज्ञ असाल तर आज आम्ही तुम्हाला कारचे टायर किती काळ वापरता येऊ शकते, याबद्दल सांगणार आहोत.
Kia Carnival खरेदी करण्यासाठी किती करावे लागेल डाउन पेमेंट? जाणून घ्या EMI चं पूर्ण गणित
जरी टायरचे ट्रेड नीट दिसत असले तरी रबराची गुणवत्ता कालांतराने खराब होत असते. 5-6 वर्षांच्या वापरानंतर ते बदलले गेले पाहिजे. काही उत्पादकांनी शिफारस केली आहे की 10 वर्षांपेक्षा जुने टायर्स बदलले गेले पाहिजेत. जरी ते कमी प्रमाणात वापरले गेले असले तरीही.
साधारणपणे टायर 40,000 ते 60,000 किलोमीटरपर्यंत टिकू शकतात. तुम्ही नियमितपणे लांब पल्ल्याचा प्रवास करत असल्यास किंवा खराब रस्त्यांवर खूप वाहन चालवल्यास, टायर लवकर खराब होऊ शकतात.
टायर ट्रेडची खोली किमान 1.6 मिमी असावी. जर ती या पेक्षा कमी असेल तर टायर बदलणे आवश्यक आहे. हे तपासण्यासाठी तुम्ही “ट्रेड वेअर इंडिकेटर” (TWI) पाहू शकता. टायरमध्ये क्रॅक, कट किंवा फुगवटा दिसल्यास, ते त्वरित बदला. टायर असमानपणे घासत असल्यास, यामुळे व्हील अलाइनमेंट किंवा बॅलन्सिंगची समस्या उद्भवू शकते.
खराब रस्त्यांवर जास्त ड्रायव्हिंग केल्याने टायरचे लाइफ कमी होते. अशा परिस्थितीत, टायर जलद झिजतात. अशावेळी ते लवकर बदलण्याची आवश्यकता असू शकते. कारमध्ये नियमितपणे जड वजन वाहून नेल्यास, टायर लवकर खराब होऊ शकतात.
योग्य टायर प्रेशर ठेवा. कमी किंवा जास्त हवेमुळे टायर लवकर खराब होऊ शकतात. तुम्ही तुमच्या टायर्सच्या स्थितीकडे दुर्लक्ष केल्यास, यामुळे तुमची आणि इतरांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. खराब टायरमुळे कारची किंवा बाइकची पकड कमकुवत होऊ शकते, ब्रेकिंगचे अंतर वाढते आणि घसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे टायर वेळेवर बदलणे अत्यंत आवश्यक आहे.