Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

500 किमी रेंज आणि कोच डोअर्स! ऑल-इलेक्ट्रिक Genesis GV90 वरून उठला पडदा! पाहा या ब्रँड न्यू कारचे फीचर्स आणि माहिती

ह्युंदाईच्या प्रीमियम ब्रँडने सादर केलेल्या ऑल-इलेक्ट्रिक SUV मध्ये भविष्यातील तंत्रज्ञानाचा अद्भुत मिलाफ पाहायला मिळतो, जिथे चालकासाठी एकही स्टार्ट बटण दिलेले नाही. अशा काही थक्क करणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे ही आलिशान गाडी लक्झरी सेगमेंटमधील जुन्या दिग्गजांची गणिते कशी बदलणार, हे पाहणे इंटरेस्टिंग ठरेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 21, 2026 | 08:30 AM
500 किमी रेंज आणि कोच डोअर्स! ऑल-इलेक्ट्रिक Genesis GV90 वरून उठला पडदा! पाहा या ब्रँड न्यू कारचे फीचर्स आणि माहिती
Follow Us
Follow Us:
  • इलेक्ट्रिक Genesis GV90 मध्ये हिडन पिलरसह अनोखे कोच डोअर्स देण्यात आले आहेत.
  • या SUV मध्ये मिळणारी १२३.५ kWh ची बॅटरी तब्बल ५०० किमी रेंज प्रदान करते.
  • १८०-डिग्री फिरणाऱ्या सीट्ससह रूफ एअरबॅग असलेली ही जगातील पहिलीच कार ठरली आहे.

ह्युंदाई मोटर ग्रुपच्या ‘जेनेसिस’ या लक्झरी ब्रँडने आपली नवीन फ्लॅगशिप फुल-साईझ ऑल-इलेक्ट्रिक SUV Genesis GV90 चे अनावरण केले आहे. Range Rover Electric आणि Mercedes-Maybach EQS SUV यांसारख्या अति-लक्झरी गाड्यांना टक्कर देण्यासाठी ही कार तयार करण्यात आली आहे. या कारची लांबी ५,२८५ मिमी, रुंदी २,०३० मिमी, उंची १,८१५ मिमी आणि व्हीलबेस ३,२४५ मिमी आहे. ही SUV स्टँडर्ड आणि ‘नेओलुन’ अशा दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल.

नेओलुन व्हर्जनमध्ये जगात पहिल्यांदाच स्वतंत्रपणे उघडणारे आणि बंद होणारे हिडन B-पिलर कोच डोअर्स देण्यात आले आहेत. याशिवाय विंग फेस मायक्रो लेन्स ॲरे हेडलाइट्स, क्लॅमशेल हूड, २४-इंच फोर्ज्ड व्हील्स आणि फ्लश-माउंटेड टेललाइट्समुळे या कारला अतिशय आकर्षक आणि आधुनिक लूक मिळतो.

महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर! लाइफस्टाईल पिकअप प्रेमींसाठी ३ नवीन डिझाइन थीम! पाहा काय आहे खास?

कारच्या आतील भागात २४.६-इंचांपर्यंत विस्तारणारी पॉप-अप OLED स्क्रीन, १८० अंश फिरणाऱ्या फ्रंट सीट्स आणि जगात पहिल्यांदाच वापरण्यात आलेली रूफ एअरबॅग एकूण १२ एअरबॅग्ज यांसारखे हाय-टेक फीचर्स मिळतात. यामध्ये स्टार्ट बटण दिलेले नाही; ड्रायव्हरने डोअर हँडल ओढताच कार आपोआप सुरू होऊन दार बंद होते. स्टीअरिंगवर मोशन कॉलम शिफ्टर आणि सेंटर कन्सोलमध्ये क्रिस्टल स्फिअर कंट्रोलर देण्यात आले आहे.

या कारमध्ये ड्युअल-मोटर सेटअप दिला असून तो ६५७ hp ची पॉवर आणि ८०० Nm चा टॉर्क जनरेट करतो. यातील १२३.५ kWh बॅटरी पॅक अवघ्या २२ मिनिटांत १०% ते ८०% चार्ज होतो आणि एका चार्जमध्ये सुमारे ५०० किलोमीटरची रेंज देतो. तसेच यामध्ये रिअर-व्हील स्टीअरिंग, मल्टी-चेंबर एअर सस्पेंशन आणि ड्युअल e-LSD यांसारखे ॲडव्हान्स फीचर्सही समाविष्ट आहेत.

TVS ने Honda ला टाकले मागे! जुलै २०२६ मध्ये स्कूटर विक्रीत प्रथमच घडला हा विक्रम!

जेनेसिस ब्रँड भारतात प्रवेश करत असून प्रथम GV80 ही मॉडेल सादर केली जाऊ शकते. त्यानंतर ही फ्लॅगशिप GV90 SUV भारताच्या शोूम्समध्ये २०२८ च्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे.

Web Title: All electric genesis gv90 suv unveiled india auto news india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 08:30 AM

Topics:  

  • automobile
  • Hyundai

संबंधित बातम्या

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
1

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
2

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?
3

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर
4

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.