अंबानी कुटुंबीयांकडे सुद्धा नाही आहे ही महागडी नंबर प्लेट, जाणून घ्या सर्वात महागड्या नंबर प्लेट्सबद्दल
आपलीकडे जेवढी लक्झरी कार्सबद्दल क्रेज आहे तितकीच क्रेज कारवर असणाऱ्या नंबर प्लेटबद्दल सुद्धा असते. रस्त्यावर नॉर्मल कार दिसली की तिच्याकडे कोणाचे एवढे लक्ष जात नाही पण जर त्या कारवर व्हीआयपी नंबर प्लेट असेल तर नक्कीच अनेकांच्या नजऱ्या त्या कारवर रोखल्या जातात. आपण सर्वेच जाणतो व्हीआयपी नंबर प्लेट्स मिळवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात.
जर आपण कोणाला विचारले की व्हीआयपी नंबर प्लेट्स किती रुपयात मिळते तर तो नक्कीच म्हणेल की लाख किंवा दीड लाख रुपये. पण भारत या किंमतींपेक्षा कितीतरी महाग किंमतीत व्हीआयपी नंबर प्लेट्स मिळतात. आज आपण भारतातील सर्वात महागड्या नंबर प्लेट्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या अदानी आणि अंबानी कुटुंबीयांकडे सुद्धा नाही आहेत.
हे देखील वाचा: कितीही येऊ द्या इलेक्ट्रिक कार्स, ‘या’ कारच्या मागणीत होणार नाही घट
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांच्याकडे BMW 7-सीरीज कार आहे ज्यावर “MH 01 AK 0001” ही नंबर प्लेट आहे. त्याची किंमत 9 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्याकडे एक रोल्स रॉयस देखील आहे, ज्यावर ‘0001’ अशी कार नंबर प्लेट आहे. त्याची किंमत 12 लाख रुपये आहे.