फोटो सौजन्य:YouTube
भारतात इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहे. वाढत्या पेट्रोल, सीएनजी, आणि डिझेलच्या किंमतीमुळे हल्ली अनेक जण इलेक्ट्रिक कार्स विकत घेत आहेत. पण आजही मार्केटमध्ये काही अशा कार्स आहेत, ज्यांच्या विक्रीवर इलेक्ट्रिक कार्स येण्यामुळे आजही काही परिणाम होत नाही आहेत. यातीलच एक कार म्हणजे मारुती सुझुकीची अल्टो कार.
हे देखील वाचा: आपल्या कारची लेदर सीट कशी ठेवावी मेंटेन? जाणून घ्या सोपे उपाय
Maruti Suzuki Alto दोन दशकांपासून भारतीय कार मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. आज आपण अशा 5 कारणांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळेच वर्षाच्या बारा महिने या कारला चांगली मागणी मिळते.
अल्टो कारला मागणी असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तिची सर्वसामान्यांना परवडणारी किंमत. ही एक बजेट फ्रेंडली कार आहे जे सामान्य कुटुंबासाठी एक उत्तम पर्याय आहे. या कारची किंमत 3.99 लाख रुपये आहे.
या कारचा मायलेज सुद्धा चांगला असल्याने अनेक जण ही कार खरेदी करत असतात. तसेच पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही व्हेरियंटमध्ये ही कार उपलब्ध असल्याने, अनेक जण ही कार खरेदी करतात.
मारुतीच्या कार मेंटेनन्सचा दृष्टीने अतिशय किफायतशीर आहेत. तसेच या कारचा मेंटेनन्स खर्चही खूप कमी आहे, ज्यामुळे ती दीर्घकाळ चालवणे सोपे जाते. या कारचे स्पेयर पार्टस सुद्धा सहज उपलब्ध आणि स्वस्त आहेत.
अल्टोच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे शहरी भागात वाहन चालवणे आणि पार्किंग करणे सोपे होते. अरुंद रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी गाडी चालवणे आणि पार्क करण्यात कुठलीही अडचण येत नाही.
मारुती सुझुकी हा भारतातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड आहे. यामुळेच अल्टोची रिसेल व्हॅल्यू देखील खूप चांगली आहे, ज्यामुळे ती विकल्यावर चांगला परतावा मिळतो.या कारणांमुळे, मारुती सुझुकी अल्टोला नेहमीच मागणी असते.