Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Auto News: Tata Altroz चा बाजारात डंका! iCNG मध्‍ये AMT टेक्नॉलॉजी, प्रवाशांसाठी खुशखबर

टाटा अल्ट्रोजने केली नवी टेक्नॉलॉजी सादर. ठरली भारतातील पहिली आणि एकमेव प्रिमीयम हॅचबॅक झाली आहे. काय आहे वैशिष्ट्य याबाबत अधिक माहिती घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 14, 2026 | 11:38 AM
टाटा अल्ट्रोज नवी टेक्नॉलॉजी

टाटा अल्ट्रोज नवी टेक्नॉलॉजी

Follow Us
Close
Follow Us:
  • टाटा अल्ट्रोझची नवी टेक्नॉलॉजी 
  • काय आहे वैशिष्ट्ये 
  • भारतातील पहिली आणि एकमेव प्रीमियम हॅचबॅक
टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लिमिटेड (टीएमपीव्‍ही) या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने आज अल्‍ट्रोज आयसीएनजीमध्‍ये एएमटी तंत्रज्ञानाच्‍या सादरीकरणाची घोषणा केली, ज्‍यासह ही वेईकल सीएनजी पॉवरट्रेनसह ऑटो (एएमटी) ट्रान्‍समिशन असलेली भारतातील पहिली व एकमेव प्रीमियम हॅचबॅक बनली आहे. ८.६९ लाख रूपये किंमत असलेली अल्‍ट्रोज आयसीएनजी एएमटी ब्रँडच्‍या ‘फिल स्‍पेशल’ तत्त्‍वाला अधिक दृढ करते, जेथे या वेईकलमध्‍ये सीएनजीची कार्यक्षमता व ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगची सोयीसुविधा एकत्र करण्‍यात आले आहेत, तसेच सेगमेंटमधील सर्वात सर्वसमावेशक मल्‍टी-पॉवरट्रेन लाइन-अप सादर करणे सुरू ठेवण्‍यात आले आहे.

कसे आहे मॉडेल

टाटा अल्‍ट्रोज आयसीएनजी एएमटी मॉडेल विविध व्‍हेरिएण्‍ट्समध्ये उपलब्ध असून, ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार निवड करता येईल. या मालिकेतील ‘प्‍युअर’ या बेस व्‍हेरिएण्‍टची दिल्लीतील एक्‍स-शोरूम किंमत ८,६९,९९० रुपये आहे, तर ‘प्‍युअर एस’ व्‍हेरिएण्‍ट ८,९९,९९० रुपयांना उपलब्ध आहे. मध्यम श्रेणीतील ‘क्रिएटिव्‍ह’ व्‍हेरिएण्‍टची किंमत ९,५९,९९० रुपये आणि ‘क्रिएटिव्‍ह एस’ व्‍हेरिएण्‍टची किंमत ९,८१,९९० रुपये निश्चित करण्यात आली आहे. या श्रेणीतील सर्वात प्रीमियम असा ‘अकॉम्‍प्‍लीश एस’ हा टॉप व्‍हेरिएण्‍ट १०,७६,९९० रुपयांना खरेदी करता येईल. या सर्व किमती दिल्लीतील एक्स-शोरूम दरांवर आधारित आहेत.

नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग

काय म्हणाले तज्ज्ञ

लाँचप्रसंगी मत व्‍यक्त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले, “अल्ट्रोजने आपल्या डिझाइन, सुरक्षा आणि पॉवरट्रेनच्या पर्यायांवर लक्ष केंद्रित करून प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये सातत्याने नवनवीन निकष प्रस्थापित केले आहेत. सीएनजी हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा इंधन पर्याय आहे. त्याचे प्रमाण आर्थिक वर्ष २५ मध्ये १९ टक्‍के आणि आर्थिक वर्ष २६ मध्ये २२ टक्‍के राहिले आहे. 

ही वाढ आता फक्त पारंपारिक बाजारपेठांपुरती मर्यादित नसून नवीन प्रदेशांमधूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आयसीएनजी लाइन-अपमध्ये एएमटी तंत्रज्ञान सादर करून आम्ही सीएनजी वेईकल्‍समध्‍ये अधिक सुविधेसाठी असलेल्या ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करत आहोत. या नवीन विस्तारामुळे अल्ट्रोज आपल्या सेगमेंटमधील सर्वात वैविध्‍यपूर्ण आणि प्रीमियम कार ठरली आहे, जी जागा किंवा सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता कार्यक्षमता, ड्रायव्हिंगमधील सहजता आणि दैनंदिन उपयुक्तता यांचा योग्य समतोल साधते.”

अल्ट्रोज आयसीएनजी एएमटी 

१.२ लिटर रेवोट्रॉन आयसीएनजी इंजिनची शक्ती असलेली, अल्ट्रोज सीएनजी मोडमध्ये ७३.५ पीएस शक्ती आणि १०३ एनएम टॉर्क निर्माण करते. आता प्रथमच याला एएमटीसह जोडण्यात आले आहे, ज्यामुळे विशेषतः शहरातील रहदारीमध्ये ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुखद आणि सोयीस्कर होतो. आयसीएनजी तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी प्रगत सिंगल ईसीयू आहे, ज्यामुळे पेट्रोल आणि सीएनजी मोडमध्ये अत्यंत सहजपणे बदल करता येतो. 

सेगमेंटमधील पहिले डायरेक्ट स्टार्ट इन सीएनजी वैशिष्ट्य यातील सुविधा वाढवते आणि चढ-उतार किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान सातत्यपूर्ण कामगिरी सुनिश्चित करते. अल्ट्रोजमध्ये टीएमपीव्‍हीचे ट्विन-सिलेंडर आयसीएनजी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामध्ये सिलेंडर्स सामानाच्या जागेच्या खाली बसवले आहेत. यामुळे सीएनजी मोडमध्येही २१० लिटरची वापरण्यायोग्य बूट स्पेस मिळते, ज्यामुळे सीएनजी वेईकल्‍सबाबत असलेल्या जागेच्या कमतरतेची समस्या दूर होते, पेट्रोल आणि डिझेल व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये ३४५ लिटर बूट स्पेस मिळते.

प्रीमियम डिझाइन आणि आरामदायी अनुभव

अल्ट्रोज आयसीएनजी एएमटीमध्ये ऑल-न्यू अल्ट्रोजची प्रीमियम डिझाइन शैली कायम ठेवण्यात आली आहे. यामध्ये फ्लश डोअर हँडल्स, इन्फिनिटी कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प्स आणि डीआरएलसह स्लीक एलईडी हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. कारच्या आतील भागात प्रवासाचा अनुभव अधिक सुखद करण्यासाठी एक्झिक्युटिव्ह लाउंज स्टाईल रिअर सीट, सॉफ्ट-टच ग्रँड प्रेस्टिजिया डॅशबोर्ड आणि हार्मनकडून विकसित केलेली इन्स्ट्रुमेंटेशन व इन्फोटेनमेंटसाठी अल्ट्रा व्ह्यू २६.०३ सेमीची ट्विन डिजिटल स्क्रीन देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, अँबियंट लाइटिंग आणि प्रशस्त मांडणीमुळे कारच्या प्रीमियम दर्जात अधिक भर पडते.

अद्वितीय सुरक्षा

अल्ट्रा-हाय-स्ट्रेंथ स्टीलसह एएलएफए आर्किटेक्चरवर आधारित असलेली अल्ट्रोज पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही पॉवरट्रेन्‍समध्ये ५-स्टार भारत एनसीएपी सेफ्टी रेटिंग मिळवणारी भारतातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक आहे. यामध्ये ६ एअरबॅग्ज, ईएसपी, आयएसओएफआयएक्‍स आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर ही प्रमाणित वैशिष्‍ट्ये देण्‍यात आली आहेत. तसेच ३६०-डिग्री एचडी सराउंड व्ह्यू सिस्टम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ऑटो हेडलॅम्प्स आणि एलईडी फॉग लॅम्प्स यांसारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्येदेखील आहेत.

मार्केटमध्ये आग लागणार! Tata Altroz नवीन अवतारात बाजारात; पाहा किंमत अन् फीचर्स…

Web Title: Amt technology introduced in the tata altroz icng the first and only premium hatchback

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • auto news
  • technology

संबंधित बातम्या

मार्केटमध्ये आग लागणार! Tata Altroz  नवीन अवतारात बाजारात; पाहा किंमत अन् फीचर्स…
1

मार्केटमध्ये आग लागणार! Tata Altroz नवीन अवतारात बाजारात; पाहा किंमत अन् फीचर्स…

१०० वर्षांचा प्रवास! Bajaj समूहाने साजरे केले शताब्दी वर्ष, असा आहे आतापर्यंतचा प्रवास
2

१०० वर्षांचा प्रवास! Bajaj समूहाने साजरे केले शताब्दी वर्ष, असा आहे आतापर्यंतचा प्रवास

गायक Jubin Nautiyal ने खरेदी केली सेकंड हँड BMW i7! लक्झरी फीचर्स पाहून व्हाल थक्क… किंमत 2 कोटींच्या घरात
3

गायक Jubin Nautiyal ने खरेदी केली सेकंड हँड BMW i7! लक्झरी फीचर्स पाहून व्हाल थक्क… किंमत 2 कोटींच्या घरात

Ducati Panigale V4 ची भारतात एन्ट्री; लॉंच होताच Sold Out, किंमत ऐकून बसेल धक्का
4

Ducati Panigale V4 ची भारतात एन्ट्री; लॉंच होताच Sold Out, किंमत ऐकून बसेल धक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.