टाटा अल्ट्रोज (फोटो- सोशल मिडिया)
टाटा मोटर्सने भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात रचला इतिहास
देशातील पहिलीच प्रीमियम हॅचबॅक कार
यामध्ये सीएनजी आणि ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगची सोय
मुंबई: टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लिमिटेड (टीएमपीव्ही) या भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीने आज अल्ट्रोज आयसीएनजीमध्ये एएमटी तंत्रज्ञानाच्या सादरीकरणाची घोषणा केली, ज्यासह ही वेईकल सीएनजी पॉवरट्रेनसह ऑटो (एएमटी) ट्रान्समिशन असलेली भारतातील पहिली व एकमेव प्रीमियम हॅचबॅक बनली आहे. ८.६९ लाख रूपये किंमत (Automobile) असलेली अल्ट्रोज आयसीएनजी एएमटी ब्रँडच्या ‘फिल स्पेशल’ तत्त्वाला अधिक दृढ करते, जेथे या वेईकलमध्ये सीएनजीची कार्यक्षमता व ऑटोमॅटिक ड्रायव्हिंगची सोयीसुविधा एकत्र करण्यात आले आहेत, तसेच सेगमेंटमधील सर्वात सर्वसमावेशक मल्टी-पॉवरट्रेन लाइन-अप सादर करणे सुरू ठेवण्यात आले आहे.
टाटा अल्ट्रोज आयसीएनजी एएमटी मॉडेल विविध व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असून, ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार निवड करता येईल. या मालिकेतील ‘प्युअर’ या बेस व्हेरिएण्टची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ८,६९,९९० रुपये आहे, तर ‘प्युअर एस’ व्हेरिएण्ट ८,९९,९९० रुपयांना उपलब्ध आहे. मध्यम श्रेणीतील ‘क्रिएटिव्ह’ व्हेरिएण्टची किंमत ९,५९,९९० रुपये आणि ‘क्रिएटिव्ह एस’ व्हेरिएण्टची किंमत ९,८१,९९० रुपये निश्चित करण्यात आली आहे. या श्रेणीतील सर्वात प्रीमियम असा ‘अकॉम्प्लीश एस’ हा टॉप व्हेरिएण्ट १०,७६,९९० रुपयांना खरेदी करता येईल. या सर्व किमती दिल्लीतील एक्स-शोरूम दरांवर आधारित आहेत.
लाँचप्रसंगी मत व्यक्त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले , “अल्ट्रोजने आपल्या डिझाइन, सुरक्षा आणि पॉवरट्रेनच्या पर्यायांवर लक्ष केंद्रित करून प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये सातत्याने नवनवीन निकष प्रस्थापित केले आहेत. सीएनजी हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा इंधन पर्याय आहे. त्याचे प्रमाण आर्थिक वर्ष २५ मध्ये १९ टक्के आणि आर्थिक वर्ष २६ मध्ये २२ टक्के राहिले आहे. ही वाढ आता फक्त पारंपारिक बाजारपेठांपुरती मर्यादित नसून नवीन प्रदेशांमधूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस
आयसीएनजी लाइन-अपमध्ये एएमटी तंत्रज्ञान सादर करून आम्ही सीएनजी वेईकल्समध्ये अधिक सुविधेसाठी असलेल्या ग्राहकांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करत आहोत. या नवीन विस्तारामुळे अल्ट्रोज आपल्या सेगमेंटमधील सर्वात वैविध्यपूर्ण आणि प्रीमियम कार ठरली आहे, जी जागा किंवा सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड न करता कार्यक्षमता, ड्रायव्हिंगमधील सहजता आणि दैनंदिन उपयुक्तता यांचा योग्य समतोल साधते.”
अल्ट्रोज आयसीएनजी एएमटी बाबत: १.२ लिटर रेवोट्रॉन आयसीएनजी इंजिनची शक्ती असलेली, अल्ट्रोज सीएनजी मोडमध्ये ७३.५ पीएस शक्ती आणि १०३ एनएम टॉर्क निर्माण करते. आता प्रथमच याला एएमटीसह जोडण्यात आले आहे, ज्यामुळे विशेषतः शहरातील रहदारीमध्ये ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुखद आणि सोयीस्कर होतो. आयसीएनजी तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी प्रगत सिंगल ईसीयू आहे, ज्यामुळे पेट्रोल आणि सीएनजी मोडमध्ये अत्यंत सहजपणे बदल करता येतो.
सेगमेंटमधील पहिले डायरेक्ट स्टार्ट इन सीएनजी वैशिष्ट्य यातील सुविधा वाढवते आणि चढ-उतार किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान सातत्यपूर्ण कामगिरी सुनिश्चित करते. अल्ट्रोजमध्ये टीएमपीव्हीचे ट्विन-सिलेंडर आयसीएनजी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामध्ये सिलेंडर्स सामानाच्या जागेच्या खाली बसवले आहेत. यामुळे सीएनजी मोडमध्येही २१० लिटरची वापरण्यायोग्य बूट स्पेस मिळते, ज्यामुळे सीएनजी वेईकल्सबाबत असलेल्या जागेच्या कमतरतेची समस्या दूर होते, पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएण्ट्समध्ये ३४५ लिटर बूट स्पेस मिळते.






