फोटो सौजन्य: Social Media
भारतात अनेक चांगल्या ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट परफॉर्मन्स कार्स ऑफर करत असतात. या कंपन्यांच्या नावानेच ग्राहक डोळे झाकून कार्स खरेदी करत असतात. टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी, या देशातील दोन बेस्ट ऑटो कंपन्या आहेत. दोन्ही कंपन्या ग्राहकांच्या आवश्यकेनुसार कार्स मार्केटमध्ये ऑफर करतात. तसेच या कंपन्या कार्सच्या मायलेज आणि किंमतीवर सुद्धा विशेष लक्षकेंद्रित करत असतात.
टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी हे दोन्ही भारतातील वाहन उद्योगातील प्रमुख आणि विश्वासाचे ब्रँड आहेत. या ऑटोमेकर्सच्या गाड्या देशभरात सर्वाधिक विकल्या जातात. मारुती सुझुकीने वर्षानुवर्षे भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवले होते. कार विक्रीच्या अहवालात मारुतीची वाहने सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असतात. मात्र यावेळी टाटा मोटर्सच्या एसयूव्हीने मारुती सुझुकीच्या कारला मागे टाकले आहे.
जानेवारी 2025 मध्ये येणार ‘या’ इलेक्ट्रिक कार्स, सिंगल चार्जवर 570Km पर्यंतची मिळणार रेंज
Autocar Pro च्या अहवालानुसार, टाटा पंच ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी SUV बनली आहे. या एसयूव्हीने विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकीच्या वॅगनआरला मागे टाकले आहे.
टाटा मोटर्सची कार देशातील सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही बनण्याची ही चार दशकांतील पहिलीच वेळ आहे. टाटा पंचने 2024 मध्ये 2.02 लाख युनिट्सची विक्री केली. तर गेल्या वर्षी मारुती वॅगनआरने 1.91 लाख युनिट्सची विक्री केली होती. सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा पंचने विक्रीच्या बाबतीत मारुतीच्या वॅगनआर आणि स्विफ्टला मागे टाकले. पाहिले तर भारतीय ऑटो मार्केटमध्ये SUV ची मागणी वाढत असल्याचे दिसते. देशातील टॉप 5 सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांमध्ये तीन SUV चा समावेश आहे.
टाटा पंचाच्या आधी, मारुती एर्टिगा 2023 मध्ये सर्वाधिक विक्री होणारी SUV बनली होती. रिपोर्ट्सनुसार, ही SUV यंदाच्या विक्री अहवालात चौथ्या स्थानावर आली आहे. यावरून समजते की ग्राहक आज प्रीमियम वाहने आणि एसयूव्हीला अधिक पसंती देत आहेत.
जुनी किंमत विसरा ! आता Citroen Basalt खरेदी करणे झाले अजूनच महाग, कंपनीने ‘इतकी’ वाढवली किंमत
भारतीय वाहन उद्योगात गेल्या वर्षी विक्रमी विक्री झाली आहे. 2024 मध्ये एकूण 42.86 लाख वाहनांची विक्री झाली आहे. त्याच वेळी, या वाहनांच्या विक्रीतील मारुती सुझुकीचा बाजारातील हिस्सा, जो 2018 मध्ये 52 टक्के होता, तो 2024 मध्ये घसरून 41 टक्क्यांवर आला आहे.
SUV बाबत लोकांच्या बदलत्या मागणीमुळे मारुतीचा बाजारातील हिस्सा कमी झाला नाही तर या ब्रँडच्या मॉडेल रँकिंगवरही परिणाम झाला आहे. मात्र, मारुतीची वाहने आजही बाजारात सर्वाधिक मायलेज देण्यासाठी ओळखली जातात, हे मात्र नक्की.