फोटो सौजन्य: iStock
इलेक्ट्रिक कार्सचे वारे देशात जोरदार वेगाने वाहताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे अनेक जण आता इलेक्ट्रिक कार्सना पहिले प्राधान्य देत आहेत. त्यातही आता अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार नवनवीन फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या कार्स लाँच करत आहे.
2024 च्या वर्षात अनेक उत्तम इलेक्ट्रिक कार्स लाँच झाल्या आहेत. यातील काही कार्सने तर रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. आता नवीन वर्षात नव्या जोमाने ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक कार लाँच करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. चला जाणून घेऊया जानेवारी 2025 मध्ये कोणत्या नवीन इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहेत.
अखेर जानेवारी 2025 मध्ये Hyundai Creta EV होणार लाँच, सोशल मीडियावर पहिला टिझर प्रदर्शित
मिलानमधील EICMA 2024 मध्ये नवीन Suzuki e-Vitara चे अनावरण करण्यात आले होते. डिझाईननुसार, ई-विटारामध्ये चारही बाजूंनी जाड क्लेडिंग, चंकी व्हील आर्च, Y-आकाराचे एलईडी हेडलॅम्प, कनेक्टेड टेललॅम्प आणि मोठे मागील बंपर दिले आहे. त्यानंतर, चार्जिंग पोर्ट समोरच्या डाव्या फेंडरवर ठेवला जातो. मागील दरवाजाच्या हँडल्सबद्दल बोलायचे तर ते सी-पिलरवर स्थित आहेत.
या कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, e-Vitara मध्ये ड्युअल डॅशबोर्ड स्क्रीन, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, क्रूझ कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो होल्ड फंक्शनसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि लेव्हल 2 ADAS सूट असेल उपलब्ध.
Creta EV चे डिझाइन नुकत्याच लाँच केलेल्या फेसलिफ्टेड पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटवर आधारित असेल. 2025 Hyundai Creta EV मध्ये अनेक प्रीमियम आणि बेस्ट फीचर्स असतील, जसे की नवीन 3-स्पोक स्टीयरिंग व्हील, ड्युअल 10.25-इंच डिजिटल स्क्रीन, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, ड्युअल कप होल्डर्ससह नवीन सेंटर कन्सोल डिझाइन, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो-होल्ड फंक्शन, ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS), 360-डिग्री कॅमेरा आणि नवीन रोटरी डायल. आहेत. ही कार पूर्ण चार्ज केल्यावर 500 किमीची रेंज देऊ शकते.
कार उत्पादक कंपन्यांसाठी डिसेंबर 2024 कसे होते? जाणून घ्या MG, Mahindra, Hyundai, Kia चे परफॉर्मन्स
एमजी मोटर इंडियाने, त्याच्या प्रीमियम चॅनेल एमजी सिलेक्ट अंतर्गत, 1960 च्या दशकातील एमजी बी रोडस्टरपासून प्रेरित एमजी सायबरस्टर इलेक्ट्रिक रोडस्टरचे अनावरण केले आहे. रेट्रो डिझाईन इलेक्ट्रिक सिझर डोअर्स सारख्या अॅडव्हान्स तंत्रज्ञानाने पूरक आहे, ज्यात ड्युअल रडार सेन्सर्स आणि अँटी-पिंच सिस्टम आहे. या कारमध्ये 528bhp पॉवर आणि 570 किमीची रेंज आहे.
महिंद्राने BE 6 आणि XEV 9e इलेक्ट्रिक SUV च्या सुरुवातीच्या किंमती आधीच जाहीर केल्या आहेत. तसेच या कार्स नोव्हेंबर 2024 मध्ये लाँच करण्यात आल्या होत्या. पण नवीन वर्षात सुद्धा या कार्स आपला जलवा दाखवू शकता. कंपनी भारत मोबिलिटी शोमध्ये दोन्ही SUV ची संपूर्ण किंमत यादी जाहीर करू शकते. दोन्ही SUV जन्मजात इलेक्ट्रिक INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. BE 6 ची दावा केलेली रेंज 556km आहे, तर XEV 9e एकाच चार्जवर 542km ची रेंज देऊ शकते.