लवकरच सणासुदीचा काळ चालू होणार आहे. या सणासुदीच्या काळात अनेक जण नवनवीन गोष्ट खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात. तसेच अनेक जण याच मुहूर्तावर नवीन बाईक किंवा कार आपल्या घरी आणत असतात. याच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनके कार उत्पादक कंपनीज नवनवीन फीचर्ससह अनेक कार्स लाँच करत असतात.
या कार्समध्ये आपल्याला अनेक फीचर्स पाहायला मिळतात ज्यामुळे आपली ड्रायविंग ही अधिकच सोपी आणि आरामदायी होते. त्यामुळेच एकेकाळी फक्त मायलेज बघून कार पसंत करणारे ग्राहक आज फीचर्सवर सुद्धा लक्ष केंद्रित करत आहे. यातीलच एक फिचर म्हणजे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल. हा एक आधुनिक फिचर आहे जो हल्ली प्रत्येक कारमध्ये देण्यात येत आहे. चला जाणून घेऊया, या फिचरचा आपल्याला कोणता फायदा होतो.
ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलमुळे तुमच्या कारचे तापमान एक सारखे ठेवण्यास मदत करते. मॅन्युअल एसीमध्ये तापमान मॅन्युअली सेट करावे लागते, परंतु ऑटो क्लायमेट कंट्रोल फीचरमुळे केबिनचे तापमान कारच्या आतील आणि बाहेरील तापमानानुसार आपोआप सेट होते.
हे देखील वाचा: आता हवेत उडायचे दिवस आले! ‘या’ देशात Flying Car ची विक्री सुरु, जाणून घ्या किंमत
कार चालवताना एसी पुन्हा पुन्हा बंद किंवा चालू ठेवल्यास त्याचा मायलेजवरही परिणाम होत असतो. पण जर कारमध्ये ऑटो क्लायमेट कंट्रोल फीचर असेल तर ते एसी त्याच तापमानात चालते ज्यामुळे मायलेज देखील सुधारते.
प्रवासादरम्यान काही लोकांना मॅन्युअल एसी पुन्हा पुन्हा लावण्याची सवय असते. ज्यामुळे ते कार चालवताना पुन्हा पुन्हा विचलित होत असतात. यामुळे अपघाताचा धोकाही वाढू शकतो. परंतु ऑटो क्लायमेट कंट्रोल फीचर अॅक्टिव्ह केल्यानंतर, कार चालक विचलित होत नाही ज्यामुळे कार चालविण्यावर तो अधिक एकाग्रतेने लक्ष केंद्रित करू शकतो. यामुळे अपघाताचा धोका सुद्धा कमी होतो.
ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल फीचरचे केवळ फायदेच नाहीत तर त्याचे तोटे देखील आहेत. या फीचेर्चा सर्वात मोठा तोटा म्हणजे एसी खराब झाल्यास, तो दुरुस्त करणे सामान्य एसी दुरुस्त करण्यापेक्षा अधिक महाग असते. यामुळे अर्थातच तुमच्या खिश्याला चांगलीच कात्री लागू शकते.