फोटो सौजन्य: YouTube
भारतात नेहमीपासूनच लक्झरी कार्सबद्दल एक विशेष आकर्षण राहिलं आहे. एखादी लक्झरी कार रस्त्यावरून जाताना दिसली की आजही अनेक जण तिच्याकडे टक लावून बघत असतात. या लक्झरी कार्समधून जास्तकरून बॉलिवूड सेलिब्रिटीज फिरताना दिसतात. त्यातही बॉलिवूड सेलिब्रिटींना अनेक महागड्या कार्स खरेदी करण्याचा छंद असतो. जेव्हा कधी एखादा स्टार नवीन कार खरेदी करतो तेव्हा त्या कारची लोकप्रियता संपूर्ण चित्रपटसृष्टीत आपोआप पसरली जाते. यासोबतच क्रीडा जगताशी संबंधित स्टार्सनाही अनेक लक्झरी आणि आरामदायी कारची क्रेझ असते.
नेते असोत, राजकारणी असोत, सिने स्टार्स असोत किंवा क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती असोत, अनेक सेलिब्रिटींनी रेंज रोव्हर कार्स खरेदी केल्या आहेत. जव्हा मर्सिडीजची क्रेझ सुरू झाली तेव्हा अनेक सिनेतारकांनाही मर्सिडीज जीएलएस मेबॅकचे वेड लागले. अभिनेता अभिषेक बच्चनलाही कार खरेदीचा चांगलाच छंद आहे. त्याने टोयोटा वेलफायरची नामक जबरदस्त कार विकत घेतली आहे. परंतु आता अनेक दिगज्ज लोकं Lexus LM या लक्झरी कारची बुकिंग करत आहे.
हे देखील वाचा: आता हवेत उडायचे दिवस आले! ‘या’ देशात Flying Car ची विक्री सुरु, जाणून घ्या किंमत
नुकतेच अभिनेता रणबीर कपूरने लक्झरी MPV Lexus LM 350h खरेदी केली आहे. या सोनिक फिनिश कारची मुंबईत किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे. यानंतर ही कार बॉलीवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक स्टार्सची पसंती बनली आहे. या कारच्या खरेदीदारांच्या यादीत रणबीर कपूरसोबतच जान्हवी कपूर, आलिया भट्ट, हार्दिक पांड्या यांचीही नावे आहेत. यासोबतच देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे सुद्धा ही कार आहे. चला जाणून घेऊया, लेक्सस एलएम बॉलीवूड स्टार्समध्ये इतकी लोकप्रिय का आहे.
Lexus LM त्याच्या अनोख्या डिझाईनमुळे बॉलिवूडच्या कलाकारांच्या मनात घर करून बसली आहे. ही MPV अनेक प्रीमियम फीचर्सने सुसज्ज आहे. या कारमधील दरवाजे इलेकट्रीसिटीच्या मदतीने उघडतात आणि बंद सुद्धा होतात. या आलिशान कारमध्ये तुम्हाला फ्रीजही मिळतो. यासोबतच या कारमध्ये गरम आर्मरेस्टची सुविधा आहे.
Lexus LM मध्ये मागील प्रवाशांसाठी 48-इंच पॅसेंजर स्क्रीन आहे. यासोबतच 23-स्पीकर जोडण्यात आले आहेत, जे प्रीमियम दर्जाचा आवाज देतात. यासोबतच या कारमध्ये वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि ॲम्बियंट लाइटिंगची फिचर आहेत.