फोटो सौजन्य: Freepik
आपण नेहमी हॉलिवूडच्या चित्रपटात फ्लाइंग कार्स पाहत असतो. लहानपणी अशा गोष्टी पाहताना आपण हरपून जायचो. आजही आपल्याला अव्हेंजर किंवा इतर सिनेमात हवेत उडणाऱ्या कार्स पाहायला मिळतात. आता तर भारतीय चित्रपटांमध्ये सुद्धा आपल्याला फ्लाइंग कार्स पाहायला मिळतात. बहुतेक जण या हवेत उडणाऱ्या कार्सना एक काल्पनिक गोष्ट म्हणून गृहीत धरतात. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की जगातील पहिली फ्लाइंग कारची विक्री सुरु झाली आहे तर? होय हे खरं आहे.
अलीकडेच तुर्कीने एका नवीन तंत्रज्ञानाने संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले आहे. त्यांनी देशात फ्लाइंग कार बनवायला सुरुवात केली आहे. नावावरूनच समजते की, या कारमध्ये रस्त्यावर धावण्याची तसेच हवेत उडण्याची क्षमता आहे. विशेष तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीच्या मदतीने या कार्स बनवण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा: डिजीटल युगात वाहतुक क्षेत्रातील बदल देत आहेत, डिजीटल भारताला चालना
तुर्कस्तानमधील ही नवीन फ्लाइंग कार Aircar या एरोस्पेस कंपनीने नवीन डिझाइन आणि तंत्रज्ञान लक्षात घेऊन तयार केल्या आहेत. शहरांमधील वाहतूक कोंडी कमी करणे आणि लोकांचा वेळ वाचवणे हे या कारचे मुख्य उद्दिष्ट आहे. तुर्कीस्थित कंपनी AirCar ने या फ्लाइंग कारची पूर्व विक्री सुरू केली असून ही कार या वर्षाच्या अखेरीस उपलब्ध होईल.
माहितीनुसार, या फ्लाइंग कारची किंमत 2 लाख ते 2.5 लाख डॉलर (तब्बल 1.67 कोटी रुपये) आहे. या कारचे तंत्रज्ञान आणि डिझाइन हे भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. या कारला आपण फ्लाय मोड आणि ड्राइव्ह मोडमध्ये सहजपणे स्विच करू शकतात. एअरकारचे संस्थापक म्हणतात की आतापर्यंत त्यांनी 300 हून अधिक यशस्वी चाचणी घेण्यात आली आहेत.
हे देखील वाचा: पेट्रोल संपलं तरी चालू शकते बाईक! फक्त फॉलो करा ‘या’ टीप्स
एअरबॅग्ज आणि ऑटोमॅटिक लँडिंग सिस्टीम यांसारख्या नवीन सेफ्टी फीचर्सचा या कारमध्ये समावेश केला जाईल. या कारची सध्या तुर्कीतील इन्फॉर्मेटिक्स व्हॅली टेक्नॉलॉजी पार्कमध्ये चाचणी सुरू आहे. त्याचे पहिले उड्डाण 2025 मध्ये होणे अपेक्षित आहे. या फ्लाइंग कारमध्ये दोन जण बसू शकतात.
सध्या ही कर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाही, मात्र तुर्की सरकार लवकरच त्या सर्वांच्या वापरासाठी लाँच करणार आहेत. या नवीन तंत्रज्ञानामुळे प्रवास तर सुधारेलच, शिवाय रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.