Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरी EV चार्ज करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका! अन्यथा खिसा होईल चांगलाच रिकामा

EVs च्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. तसेच अनेक जण ही वाहने घरीच चार्ज करत असतात. मात्र, अशावेळी काही चुका टाळणे फार महत्वाचे आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 07, 2026 | 04:44 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत चांगलीच वाढ
  • अनेक जण घरीच चार्ज करतात इलेक्ट्रिक वाहने
  • EV चार्ज करताना काही चुका टाळणे फार महत्वाचे
भारतामध्ये सध्या Electric Vehicle च्या मागणीत झपाट्याने वाढ होतेय. रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहने दिसणे आता सामान्य झाले आहे आणि अनेक लोक इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याकडेही वळत आहेत. मात्र, अजूनही अनेक ठिकाणी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सहज उपलब्ध नसल्यामुळे बहुतेक लोक आपली इलेक्ट्रिक कार किंवा स्कूटर घरीच चार्ज करणे पसंत करतात. पण घरी EV चार्ज करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

चार्जिंग केबलची तपासणी करा

इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग केबलची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे. केबल कुठे तुटलेली, सोललेली किंवा प्लग सैल असेल तर ती वापरू नये. चार्जिंग करताना तार किंवा प्लग जास्त गरम होत असल्यास ते लगेच बदलणे योग्य ठरते. योग्य पद्धतीने चार्ज केल्यास बॅटरीचे आयुष्य वाढते आणि शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.

कितीही मोठा असू द्या स्पीड-ब्रेकर! ‘या’ 5 सर्वात उंच Compact SUV अजिबात घासल्या जाणार नाही

एक्स्टेन्शन बोर्ड वापरणे टाळा

EV चार्ज करताना एक्स्टेन्शन बोर्ड वापरणे टाळावे. वाहन पूर्ण चार्ज होण्यासाठी बराच वेळ लागतो, त्यामुळे एक्स्टेन्शन बोर्डच्या तारांवर जास्त लोड येऊन त्या गरम होऊ शकतात. त्यामुळे सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे चार्जर थेट भिंतीवरील मजबूत आणि चांगल्या दर्जाच्या सॉकेटमध्ये लावणे.

कंपनीचा चार्जरच वापरा

EV चार्ज करण्यासाठी शक्यतो कंपनीने दिलेला मूळ चार्जरच वापरावा. हा चार्जर वाहनाच्या बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमनुसार (BMS) तयार केलेला असतो, त्यामुळे बॅटरी सुरक्षित राहते. स्वस्त किंवा स्थानिक चार्जर वापरल्यास गाडी ओव्हरहिट होण्याची शक्यता असते आणि आग लागण्याचा धोका वाढू शकतो. योग्य चार्जर वापरल्यास बॅटरी दीर्घकाळ चांगल्या स्थितीत राहते.

बॅटरी फुल झाल्यावर चार्जर काढा

आजकाल बहुतेक EV मध्ये बॅटरी 100% झाल्यावर चार्जिंग आपोआप थांबते. तरीही वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे. बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतर अनेक तास प्लग जोडून ठेवणे टाळावे, कारण याचा बॅटरीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट

चार्जिंगसाठी योग्य जागा निवडा

EV चार्ज करताना ती जागा पूर्णपणे कोरडी असणे महत्त्वाचे आहे. तसेच तिथे हवा खेळती राहील याचीही काळजी घ्यावी, जेणेकरून चार्जिंगदरम्यान निर्माण होणारी उष्णता बाहेर जाईल. पावसाळ्यात पार्किंगमध्ये पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्या. जर स्कूटरची बॅटरी काढून चार्ज करत असाल, तर ती थेट जमिनीवर न ठेवता टेबल किंवा शेल्फवर ठेवणे अधिक सुरक्षित ठरते.

 

Web Title: Avoid 5 mistakes while charing ev at your home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • car care tips
  • Charging Station
  • Electrical Vehical

संबंधित बातम्या

Car Care Tips: उन्हाच्या तडाख्यामुळे तुमची कार ठरू शकते ‘खर्चाचा बॉम्ब’; ही छोटी चूक पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
1

Car Care Tips: उन्हाच्या तडाख्यामुळे तुमची कार ठरू शकते ‘खर्चाचा बॉम्ब’; ही छोटी चूक पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

पावसाळ्यात तुमचीही कार होऊ शकते भंगार! गंज लागू नये म्हणून झटपट करा हे काम
2

पावसाळ्यात तुमचीही कार होऊ शकते भंगार! गंज लागू नये म्हणून झटपट करा हे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.