Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजाज ऑटोच्या नफ्यात 62% वाढ! दुसऱ्या तिमाहीत ₹3,436 कोटींची कमाई; निर्यात आणि EV विक्रीचा मोठा हात

बजाज ऑटोच्या नफ्यात एका वर्षात 62% वाढ होऊन तो ₹3,436 कोटींवर पोहोचला आहे. निर्यातीत 41% वाढ आणि चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या दुपटीहून जास्त विक्रीने कंपनीला कशी साथ दिली? इलेक्ट्रिक स्कूटरच्या मार्केटमध्ये पुढील 5 वर्षांत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 28, 2026 | 02:25 PM
बजाज ऑटोच्या नफ्यात 62% वाढ! दुसऱ्या तिमाहीत ₹3,436 कोटींची कमाई; निर्यात आणि EV विक्रीचा मोठा हात
Follow Us
Follow Us:
  • बजाज ऑटोचा एकत्रित निव्वळ नफा 62% वाढून ₹3,436.1 कोटींवर पोहोचला.
  • कंपनीच्या निर्यातीत 41% वाढ झाली, तर एकूण वाहन विक्री 1.54 दशलक्ष युनिट्सवर पोहोचली.
  • चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री दुपटीहून जास्त झाली; इलेक्ट्रिक वाहनांचा महसुलातील वाटा एक-तृतीयांश झाला.
बजाज ऑटोने आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीत पावरफुल आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीत कंपनीचा टोटल निव्वळ प्रोफीट मागच्या वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत 62% वाढून ₹3,436.1 कोटी झाला. मागच्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला ₹2,122.03 कोटी नफा झाला होता.

कंपनीच्या कामगिरीला निर्यातीतील वाढ आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतून चांगला आधार मिळाला. या तिमाहीत बजाज ऑटोचा ऑपरेशन्समधील एकत्रित महसूल 59% वाढून ₹25,125.56 कोटी झाला. वाढलेल्या प्रोडक्शन आणि कच्च्या मालाच्या खर्चामुळे एकूण खर्चही वाढून ₹21,107.36 कोटी झाला. तरीही महसूल आणि नफ्यातील वाढ कंपनीसाठी सकारात्मक ठरली.

निर्यातीत 41% वाढ; एकूण विक्री 1.54 दशलक्ष युनिट्स

जुलै-सप्टेंबर तिमाहीत बजाज ऑटोने दुचाकी आणि तीनचाकी मिळून 1.54 दशलक्ष वाहने विकली. मागच्या वर्षी याच काळात ही संख्या 1.29 दशलक्ष होती. देशांतर्गत विक्री 4% वाढून 770,356 युनिट्स झाली, तर निर्यात 41% वाढून 778,528 युनिट्सवर पोहोचली.

दुचाकींची एकूण विक्री 20% वाढून 1.28 दशलक्ष युनिट्स झाली. दुचाकींची निर्यात 43% वाढून 676,545 युनिट्सवर पोहोचली. व्यावसायिक वाहनांची विक्री 18% वाढून 264,923 युनिट्स झाली. या विभागातील निर्यात 26% वाढून 101,983 युनिट्स झाली.

BMW ची सेल्फ-बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर भारतात पेटंट! थांबल्यावरही पडणार नाही, रायडरसाठी खास केज डिझाइन

चेतक इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री दुपटीहून जास्त

बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड चेतकने आतापर्यंतची सर्वात जास्त तिमाही नोंदवली. तिची विक्री मागच्या वर्षाच्या तुलनेत दुपटीहून जास्त झाली. कंपनीच्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा देशांतर्गत महसुलाच्या सुमारे एक-तृतीयांश झाला आहे. पुढील 3 ते 5 वर्षांत स्कूटर विक्रीतील इलेक्ट्रिक मॉडेल्सचा वाटा सध्याच्या 25% वरून सुमारे 50% पर्यंत पोहोचू शकतो, असा कंपनीचा अंदाज आहे.

केटीएम आणि ट्रायम्फचीही चांगली कामगिरी

केटीएम आणि ट्रायम्फ या प्रीमियम मोटरसायकल ब्रँडच्या देशांतर्गत महसुलात 45% वाढ झाली. दोन्ही ब्रँडची एकत्रित विक्री 40,000 युनिट्सच्या पुढे गेली. बजाज ऑटोच्या स्वतंत्र आर्थिक निकालांमध्येही निव्वळ नफा 35% वाढून ₹3,353.76 कोटी झाला. ऑपरेशन्समधील महसूल 34% वाढून ₹20,003.43 कोटी झाला. निर्यात आणि इलेक्ट्रिक वाहनांची वाढ कंपनीच्या आर्थिक कामगिरीत महत्त्वाची ठरली.

बजेट 1 लाखांचं? मग ही इलेक्ट्रिक स्कूटर पाहाच! e-SPRINTO G1 मधील हे भन्नाट फीचर्स जाणून घ्या

💡 Frequently Asked Questions

1. बजाज ऑटोला आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीत किती नफा झाला?

जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ₹3,436.1 कोटी झाला. मागच्या वर्षी याच तिमाहीत तो ₹2,122.03 कोटी होता.

2. बजाज ऑटोच्या निर्यातीत किती वाढ झाली?

दुसऱ्या तिमाहीत बजाज ऑटोची एकूण निर्यात 41% वाढून 778,528 युनिट्सवर पोहोचली. दुचाकींच्या निर्यातीत 43% वाढ नोंदवण्यात आली.

3. बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीबाबत कंपनीचा अंदाज काय आहे?

चेतकची विक्री दुसऱ्या तिमाहीत मागच्या वर्षाच्या तुलनेत दुपटीहून जास्त झाली. कंपनीच्या अंदाजानुसार, पुढील 3 ते 5 वर्षांत स्कूटर विक्रीतील इलेक्ट्रिक मॉडेल्सचा वाटा सध्याच्या 25% वरून सुमारे 50% होऊ शकतो.

Web Title: Bajaj auto q2 profit growth exports chetak electric scooter sales auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj Auto
  • financial gain

संबंधित बातम्या

महाराष्ट्र सरकारचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावर भर; बजाज ऑटोला 66.82 कोटींची मदत मंजूर
1

महाराष्ट्र सरकारचा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यावर भर; बजाज ऑटोला 66.82 कोटींची मदत मंजूर

E20 पेट्रोलविरोधातील आंदोलन ‘पेड कॅम्पेन’ असल्याचा नितीन गडकरींचा दावा! E100 इंधनाचा मार्गही मोकळा
2

E20 पेट्रोलविरोधातील आंदोलन ‘पेड कॅम्पेन’ असल्याचा नितीन गडकरींचा दावा! E100 इंधनाचा मार्गही मोकळा

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 मध्ये लवकरच मिळणार ट्यूबलेस स्पोक व्हील्स! Motoverse 2026 मध्ये होऊ शकते एंट्री
3

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 मध्ये लवकरच मिळणार ट्यूबलेस स्पोक व्हील्स! Motoverse 2026 मध्ये होऊ शकते एंट्री

हार्ले-डेव्हिडसन स्प्रिंट 440 बाईक पहिल्यांदाच विनाकव्हर दिसली; 2027 मध्ये भारतात लाँच होण्याची शक्यता!
4

हार्ले-डेव्हिडसन स्प्रिंट 440 बाईक पहिल्यांदाच विनाकव्हर दिसली; 2027 मध्ये भारतात लाँच होण्याची शक्यता!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.