फोटो सौजन्य: Pinterest
रेनॉल्टच्या मते, नवीन डस्टरची टेस्टिंग केवळ रस्त्यावरच नाही तर जगातील सर्वात कठीण परिस्थितीतही करण्यात आली आहे. 23 अंश ते 55 अंश सेल्सिअस तापमानात या कारची टेस्टिंग घेण्यात आली आहे. लेह-लडाखसारख्या उंच भागात आणि उंच ठिकाणी देखील ही कार चालवण्यात आली. इतकेच नव्हे तर ही कार 10 लाख किलोमीटरची टेस्टिंग ब्राझील, रोमानिया, फ्रान्स, चीन आणि चेक रिपब्लिक सारख्या देशांमध्ये करण्यात आली आहे.
1 लिटर पेट्रोलवर 65 किमी धावण्याची धमक! Hero Splendor ला प्रत्येकवेळी पाणी पाजते ‘ही’ बाईक
रेनो (Renault) कंपनीने स्पष्ट केले आहे की भारतात येणाऱ्या नव्या डस्टर (Duster) चे डिझाइन आंतरराष्ट्रीय मॉडेलपेक्षा थोडे वेगळे असेल. जारी करण्यात आलेल्या टीझरनुसार, या एसयूव्हीला अधिक मस्क्युलर आणि मजबूत लुक देण्यात आला आहे. पातळ LED हेडलॅम्प्स आणि आयब्रो-शेप DRL मुळे ही एसयूव्ही आकर्षक दिसते. यासोबतच नवीन ग्रिल डिझाइन, फ्रंट बंपरमधील स्लिम एअर स्लिट्स आणि फॉग लॅम्प्समुळे याचा लूक अधिक प्रीमियम वाटतो.
नव्या डस्टरचा साइड प्रोफाइल चौकोनी (स्क्वेअर) आकाराचा असणार असला तरी, त्यावरील सरफेस आधीपेक्षा अधिक स्मूद ठेवण्यात आली आहे. C-पिलरवर मागील दरवाज्याचे हँडल देण्यात आले असून, व्हील आर्चभोवती जाड क्लॅडिंग पाहायला मिळते, ज्यामुळे एसयूव्हीचा रफ-टफ अंदाज अधिक ठळक होतो.
Volkswagen ने ग्राहकांचं ऐकलं! जानेवारी 2026 मध्ये जाहीर केले ‘या’ Cars वर धुवाधार ऑफर्स
या एसयूव्हीच्या टॉप व्हेरिएंट्समध्ये 18-इंच अलॉय व्हील्स आणि मागील बाजूस रॅपअराउंड टेललॅम्प डिझाइन देण्यात येणार आहे. यामुळे डस्टरला आधुनिक आणि दमदार लूक मिळतो. इंजिनच्या बाबतीत, नवी डस्टर फक्त पेट्रोल इंजिनसह उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याआधी भारतात डस्टर डिझेल इंजिनमध्ये येत होती, मात्र नव्या जनरेशनमध्ये फक्त पेट्रोल पर्याय देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.






