
फोटो सौजन्य: Gemini
TVS Raider 125 ची एक्स-शोरूम किंमत 80,500 रुपये ते 95,600 रुपये दरम्यान आहे. ही बाईक 7 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 99 पेक्षा जास्त कनेक्टेड फीचर्ससह डिजिटल डिस्प्ले देण्यात आले असून, कंपनीनुसार ही बाईक 56.7 kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.
TVS Sport ही कंपनीच्या सर्वात स्वस्त बाईक्सपैकी एक आहे. या बाईकची किंमत 55,100 रुपये ते 57,100 रुपये इतकी आहे. 109 cc इंजिन असलेली ही बाईक 80 kmpl मायलेज देण्याचा दावा करते. कमी किंमत आणि उत्तम मायलेजमुळे TVS Sport ही ब्रँडमधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईक्सपैकी एक आहे.
Ola आणि Ather साठी नवा धक्का! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची 100+ किमी रेंज, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
Hero Xtreme 125R ही एक स्टायलिश आणि स्पोर्टी लूक असलेली बाईक आहे. जर तुम्हाला 1 लाख रुपयांच्या आत आकर्षक डिझाइनची बाईक हवी असेल, तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 91,760 रुपये पासून सुरू होते. अलीकडेच ही बाईक ड्युअल-चॅनल ABS व्हेरिएंटमध्येही लाँच करण्यात आली असून, या व्हेरिएंटची किंमत 1.04 लाख रुपये आहे.
Hero Splendor Plus ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे. अनेक वर्षांपासून ग्राहकांचा या बाईकवर विश्वास आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 73,902 रुपये ते 76,437 रुपये दरम्यान आहे. कंपनीनुसार ही बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये 60 ते 70 किलोमीटरपर्यंत मायलेज देते.
Bajaj Pulsar 125 ही देखील रोजच्या ऑफिस ये–जासाठी एक विश्वासार्ह पर्याय मानली जाते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 80,004 रुपये ते 88,126 रुपये दरम्यान आहे. कंपनीचा दावा आहे की पल्सर 125 एका लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 66 किलोमीटर मायलेज देते.