
फोटो सौजन्य: Gemini
जर तुम्हीही पहिल्यांदाच तुमच्या कुटुंबासाठी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. बहुतेकदा, सर्वात मोठे आव्हान म्हणजे बजेटमध्ये अशी कार निवडणे जी खिशाला परवडणारी असेल आणि उत्कृष्ट मायलेज, स्पेस आणि फीचर्स देईल. भारतीय ऑटो बाजारात अशा काही कार्स आहेत ज्या 5 ते 7 लाख रुपयांच्या बजेटमध्ये चांगला मायलेज, भरपूर केबिन स्पेस आणि आवश्यक फीचर्सचे योग्य कॉम्बिनेशन देतात.
घर आणि ऑफिसच्या प्रवासासाठी Petrol Car चांगली की Electric? अगदी सोप्या भाषेत समजून घ्या
मारुती सुझुकी स्विफ्ट ही कार कुटुंबातील कारप्रेमींमध्ये बऱ्याच काळापासून आवडती आहे. 5.79 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीसह, ही कार 22-24 किमी प्रति लिटर मायलेज देते. याचे नवीन मॉडेल आणखी प्रॅक्टिकल आणि अपडेटेड झाले आहे. 9-इंचाची स्मार्ट टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल आणि सहा एअरबॅग्ज सारख्या फीचर्समुळे ती एक सुरक्षित आणि आधुनिक पर्याय बनते.
तुम्हाला जर 5 लाखांच्या आत एखादी चांगली फॅमिली कार हवी असल्यास Renault Kwid तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. 4.92 लाख रुपयांची इंट्रोडक्टरी किंमत, SUV-स्टाइल डिझाइन आणि 20–22 kmpl माइलेज यामुळे ती लहान कुटुंबांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 8-इंच टचस्क्रीन आणि रियर कॅमेरासारखी फीचर्सही दिली आहेत, जी साधारणपणे बजेट कारमध्ये कमी दिसतात.
आरामदायी आणि प्रीमियम इंटिरिअर हवे असेल, तर Hyundai Grand i10 NIOS उत्तम पर्याय आहे. 5.47 लाख रुपयांपासून सुरू होणारी किंमत आणि 18–21 kmpl मायलेज हे याचे मुख्य आकर्षण आहे. वायरलेस चार्जर, ऑटो AC आणि 8-इंच इन्फोटेनमेंट सिस्टममुळे ही कार इतर कार्सपेक्षा वेगळी ठरते. 6 एअरबॅग्समुळे सुरक्षा बाबतीतही ती विश्वासार्ह मानली जाते.
जर तुम्हाला अधिक केबिन स्पेस हवे असेल, तर जवळपास 7 लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत Honda Amaze एक उत्तम पर्याय आहे. 18–20 kmpl माइलेज आणि मोठा बूट स्पेस यामुळे लांब प्रवासासाठी ही कार खूपच आरामदायक ठरते. याची राइड क्वालिटी स्मूथ असून ड्राइविंग अनुभवही प्रीमियम वाटतो.
Tata Tiago ही तिच्या सॉलिड बिल्ड क्वालिटी आणि सुरक्षेसाठी ओळखली जाते. 4.99 लाख रुपयांची किंमत आणि 19–23 kmpl मायलेजमुळे ही कार खऱ्या अर्थाने Value-For-Money ठरते. 7-इंच टचस्क्रीन, डिजिटल कन्सोल आणि इतर मॉडर्न फीचर्समुळे ती बजेट सेगमेंटमध्ये एक मजबूत पर्याय आहे.