फोटो सौजन्य: Gemini
जर तुमची दररोजच्या कारची रनिंग जास्त असेल, म्हणजे तुम्ही रोज 40 किमीपेक्षा जास्त प्रवास करत असाल, तर ईव्ही तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. जास्त चालवल्यावर कारच्या रनिंग कॉस्टमधील बचत इतकी जास्त असते की ईव्हीची सुरुवातीची किंमत 3 ते 5 वर्षांत भरून निघते.
बस्स ‘इतकाच’ EMI! 3 लाखांचे डाउन पेमेंट आणि Maruti Brezza दारात उभी
जर तुमच्याकडे घरात चार्जिंगची सुविधा, सुरक्षित पार्किंग आणि चार्जिंग पॉइंट बसवण्यासाठी जागा असेल, तर ईव्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. घरातील चार्जिंग सर्वात स्वस्त पडते आणि तुम्ही रोज रात्री कार चार्जला लावून सकाळी फुल चार्जसह बाहेर पडू शकता.
जर तुम्ही 5 वर्षांत 70,000 किमीपेक्षा जास्त कार चालवत असाल, तर ईव्ही तुम्हाला ₹1 लाख ते ₹3 लाखांपर्यंतची बचत करून देऊ शकते.
जर तुमची दररोजची रनिंग खूप कमी असेल, म्हणजे तुम्ही रोज 20 किमीपेक्षा कमी कार चालवत असाल किंवा महिन्यात फक्त काही वेळा कारचा वापर करत असाल, तर पेट्रोल कार तुमच्यासाठी अधिक योग्य पर्याय ठरतो. ईव्हीच्या तुलनेत पेट्रोल कारची सुरुवातीची किंमत कमी असल्यामुळे बजेटही कमी लागते, आणि रनिंग कमी असल्याने पेट्रोलचा खर्चही फारसा जाणवत नाही.
तसेच, तुम्हाला वारंवार लांब पल्ल्याच्या प्रवासावर जावे लागते, तर पेट्रोल कार तुमच्यासाठी अधिक सोयीची ठरते. देशभरात पेट्रोल पंप सहज उपलब्ध असल्यामुळे चार्जिंग स्टेशन शोधण्याचा त्रास होत नाही.






