फोटो सौजन्य: X.com
बाईक असो किंवा कार, कोणतेही वाहनं खरेदी करताना आपल्याला जीएसटी भरावाच लागतो. मात्र, मागील काही वर्षांपासून वाहनांवरील GST कमी करावा अशी मागणी होत होती. अखेर केंद्र सरकारने सामान्य नागरिकांची हाक ऐकली आणि वाहनांवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांवर आणला. यामुळे भारतातील बजेट फ्रेडली बाईक्सच्या किमतीत मोठा फरक पाहायला मिळाला आहे.
केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये सुधारणा केली असून त्यामुळे लोकांना दिवाळीपूर्वी मोठे गिफ्ट मिळाले आहे. आता कार आणि दुचाकी खरेदी करणे अधिक सोपे होणार आहे, कारण जीएसटी कपातीनंतर त्यांच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. जर तुम्ही लवकरच Hero Glamour खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बाईक आता आधीपेक्षा किती स्वस्त मिळणार आहे.
‘या’ Electric Bike वर मिळतेय आतापर्यंतची मिळतेय बेस्ट डिस्काउंट, हजारो रुपयांची होणार बचत
नवीन जीएसटी सुधारांनुसार 350cc पर्यंतचे स्कूटर्स आणि बाईक्स आता स्वस्त होतील, तर 350cc पेक्षा जास्त क्षमतेच्या बाईक्स महाग होणार आहेत. छोट्या वाहनांवरील जीएसटी 28% वरून कमी करून 18% करण्यात आला आहे. हे नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
Hero Glamour मध्ये 124.7cc इंजिन मिळते, जे 350cc पेक्षा कमी आहे. जीएसटी दरकपातीनंतर Hero Glamour ची किंमत तब्बल 7,813 रुपयांनी कमी झाली आहे. 125cc सेगमेंटमधील या बाईकमध्ये क्रूझ कंट्रोल, मोठा डिस्प्ले यांसारखे अनेक नवे फीचर्स दिले गेले आहेत.
Hero Glamour दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. Glamour Drum Brake OBD2B व्हेरिएंटची किंमत 87,198 रुपये आहे, तर Glamour Disc Brake व्हेरिएंटची किंमत 91,198 रुपये आहे. ऑन-रोड किंमत शहर आणि डीलरशिपनुसार बदलू शकते.
Maruti Victoris की Volkswagen Taigun, फीचर्स, मायलेज आणि इंजिनच्या बाबतीत कोणती एसयूव्ही एकदम बेस्ट?
हीरोने या बाईकमध्ये अनेक मॉडर्न आणि प्रीमियम फीचर्स दिले आहेत. यात फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, जे स्पीड, फ्युएल लेव्हल, ओडोमीटर, ट्रिप मीटर आणि रिअल-टाईम मायलेज दाखवते. याशिवाय i3S (Idle Stop-Start System), LED हेडलॅम्प आणि DRL, USB चार्जिंग पोर्ट, स्प्लिट अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध आहेत.
Xtec व्हेरिएंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि कॉल/मेसेज नोटिफिकेशन यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेसाठी यात इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम (IBS), साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ, बँक अँगल सेन्सर, हॅजर्ड लॅम्प, 240mm फ्रंट डिस्क ब्रेक आणि ट्यूबलेस टायर्स देण्यात आले आहेत.