फोटो सौजन्य: iStock
भारतात नेहमीच एसयूव्ही विभागातील वाहनांना चांगली मागणी असते. याच मागणीकडे लक्ष देत अनेक ऑटो कंपन्या बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. आता तर इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील भारतात लाँच होत आहे. नुकतेच देशातील आघीडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने या सेगमेंटमध्ये Maruti Victoris लाँच केली आहे.
Maruti Victoris बाजारात थेट फोक्सवॅगन टायगुनशी स्पर्धा करेल. मात्र, इंजिन, मायलेज, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत या दोन्ही एसयूव्हीपैकी कोणता ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
मारुतीने अलीकडेच व्हिक्टोरिस एसयूव्ही लाँच केली आहे. ही एसयूव्ही कंपनीकडून 1.5-लिटर इंजिनद्वारे चालते. यामुळे ती 75.8 किलोवॅट पॉवर आणि 139 एनएम टॉर्क देते. याशिवाय, ती मजबूत हायब्रिड आणि सीएनजी तंत्रज्ञान पर्यायांसह देखील ऑफर केली जाते.
तेच Volkswagen Taigun मध्ये दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. यात 1.5 लिटर पेट्रोल TSI इंजिनमधून 150 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क मिळतो. तर दुसरा पर्याय म्हणून 1.0 लिटर पेट्रोल TSI इंजिन दिला आहे, जो 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क निर्माण करतो. या इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड DSG ट्रान्समिशनचे पर्याय देण्यात आले आहेत.
मारुतीकडून उपलब्ध असलेली व्हिक्टोरिस SUV मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत प्रति लिटर 21.18 किमी इतका मायलेज देते. तर याच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये प्रति लिटर 21.06 किमी इतका मायलेज मिळतो. दरम्यान, Volkswagen Taigun ला देखील एका लिटर पेट्रोलमध्ये 18.46 ते 19.89 किमीपर्यंत चालवता येते.
मारुतीकडून विक्टोरिस SUV अनेक उत्कृष्ट सेफ्टी फीचर्ससह सादर करण्यात आले आहे. यात 6 एअरबॅग्स, ABS, EBD, ISOFIX चाइल्ड अँकरेज यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
तर Volkswagen Taigun ने सेफ्टीच्या बाबतीत क्रॅश टेस्टमध्ये पूर्ण 5 स्टार रेटिंग मिळवले आहे. Global NCAP कडून प्रौढ व मुलांच्या सुरक्षेसाठी मान्यता मिळालेल्या या SUV मध्ये सहा एअरबॅग्स, EBD, ESC, VSM, हिल-स्टार्ट कंट्रोल, TPMS, रियर डिस्क ब्रेक, सीट बेल्ट प्री-टेंशनर्स, थ्री-पॉइंट सीटबेल्ट रिमाइंडर, ISOFIX चाइल्ड अँकरेज, ESS, ऑटो हेडलॅम्प, हेडलॅम्प एस्कॉर्ट, पार्किंग सेन्सर्स, रियर कॅमेरा, ड्रायव्हर रियर व्ह्यू मॉनिटरिंग सिस्टीमसह 40 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
मारुतीने अद्याप व्हिक्टोरिसची किंमत जाहीर केलेली नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की त्याची एक्स-शोरूम किंमत देखील सुमारे 11 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. त्याच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत देखील 20 लाख रुपयांपर्यंत असू शकते. त्याच वेळी, फोक्सवॅगन टायगुनची किंमत 10.99 लाख रुपयांपासून ते 19.58 लाख रुपयांपर्यंत आहे.