
फोटो सौजन्य: Gemini
या लिस्टमध्ये पहिले स्थान मारुती सुझुकी एस-प्रेसोचे आहे, जी भारतातील सर्वात परवडणारी आणि लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही आहे. GST कमी झाल्याने या कारची किंमत आता फक्त 3.49 लाख रुपये झाली आहे. त्याची एसयूव्हीसारखी रचना आणि 180 मिमी ग्राउंड क्लिअरन्समुळे ती लहान विभागातही वेगळी दिसते. यात 1.0-लिटर पेट्रोल इंजिन आहे जे 66 पीएस पॉवर आणि 89 एनएम टॉर्क निर्माण करते. याचे सीएनजी व्हर्जन प्रति किलोग्रॅम 33 किलोमीटर पर्यंत मायलेज देते.
अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्समुळे ‘हे’ प्रीमियम हेल्मेट चर्चेत! अपेक्षित किंमत 17,000 ते 20,000 रुपये
दुसरी कार, अल्टो k10, ही भारतातील सर्वात लोकप्रिय छोट्या कारपैकी एक आहे. 3.69 लाख किमतीत ही कार उत्कृष्ट डिझाइन आणि उत्तम मायलेज प्रदान करते. यात 1.0-लिटर K10B इंजिन आहे जी 67 पीएस पॉवर निर्माण करते. सीएनजी मॉडेल प्रति किलोग्रॅम 33.85 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. फीचर्समध्ये पॉवर विंडो, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टॉप व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्ज समाविष्ट आहेत.
जर तुम्हाला SUV सारखा लूक असलेली कार हवी असेल, तर Renault Kwid हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या कारची किंमत 4.29 लाख रुपयांपासून पासून सुरू होते. SUV-प्रेरित डिझाइन आणि 184 mm ग्राउंड क्लीअरन्समुळे Kwid तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. यामध्ये 1.0-लीटर इंजिन देण्यात आले असून ते 68 PS पॉवर आणि 91 Nm टॉर्क निर्माण करते. Kwid चे मायलेज साधारण 22 किलोमीटर प्रति लीटर आहे. फीचर्सच्या बाबतीत 8-इंच टचस्क्रीन, रियर कॅमेरा आणि क्रूज कंट्रोलसारख्या सुविधा मिळतात.
आला रे आला डिस्काउंट आला! ‘या’ SUVs वर 2.50 लाखांपय रुपये वाचण्याची संधी
Maruti Suzuki Celerio ही भारतातील सर्वाधिक फ्युएल-एफिशिएंट कार्सपैकी एक मानली जाते. या कारची सुरुवातीची किंमत 4.69 लाख रुपये आहे. यात 1.0-लीटर इंजिन देण्यात आले असून ते 67 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते. CNG व्हेरिएंटमध्ये ही कार सुमारे 34 किलोमीटर प्रति किलोग्राम मायलेज देते, त्यामुळेच या कारला “मायलेज क्वीन” असेही म्हटले जाते. क्लायमेट कंट्रोल, 7-इंच टचस्क्रीन, मोठा बूट स्पेस आणि ड्युअल एअरबॅग्ससारख्या फीचर्समुळे Celerio अधिक प्रीमियम अनुभव देते.