फोटो सौैजन्य: iStock
डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतींमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. पण असे जरी असले तरी सीएनजी कारच्या विक्रीत देखील कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. CNG हा एक किफायतशीर इंधन पर्याय मानला जातो. जर तुमचे बजेट 10 लाख रुपये असेल आणि तुम्ही सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आज आपण देशातील काही सर्वोत्तम कारबद्दल जाणून घेणार आहोत ज्या मायलेज आणि सुरक्षिततेच्या बाबतीत उत्कृष्ट आहेत.
पहिल्या कारचे नाव मारुती सुझुकी अल्टो के१० सीएनजी आहे. अल्टो K10 ही सध्या भारतातील सर्वात स्वस्त सीएनजी कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5 लाख 96 हजार रुपये आहे. ही कार हेव्ही ट्राफिकमधून देखील सहजतेने जाते. लहान कुटुंबासाठी योग्य असलेलय या कारमध्ये 4 लोक आरामात बसू शकतात.
लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वे होईल या कारमध्ये फिट, फक्त 6 लाखात येते ही 7 सीटर कार
मारुती सुझुकी अल्टोमध्ये एसी, फ्रंट पॉवर विंडो, पार्किंग सेन्सर, सेंट्रल कन्सोल आर्मरेस्ट, गियर शिफ्ट इंडिकेटर, अॅडजस्टेबल हेडलॅम्प, हॅलोजन हेडलॅम्प, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, ड्युअल एअरबॅग्ज अशा अनेक उत्तम फीचर्स आहेत.
तुमच्यासाठी दुसरा सर्वोत्तम पर्याय म्हणजे मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी. मारुती सुझुकी सेलेरियो या सीएनजी कारमध्ये सर्वात जास्त मायलेज देणारी कार आहे, जी 34.43 किमी/किलो मायलेज देते. त्याची एक्स-शोरूम किंमत 6.69 लाख रुपये आहे. या कारचा चालवण्याचा खर्च बाईकपेक्षाही कमी आहे, ज्यामुळे इंधन खर्च कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
या कारमध्ये 5 लोक सहज बसू शकतात. सेफ्टीसाठी, या कारमध्ये तुम्हाला अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD आणि एअरबॅग्जची सुविधा मिळते.
टाकी फुल्ल केल्यास कापेल 750 km चे अंतर ! फक्त 10 हजारात करा ‘ही’ बजेट बाईक तुमच्या नावावर
तिसरा सर्वोत्तम पर्याय म्हणजे टाटा टियाओगो आयसीएनजी, जी 27 किमी/किलोग्राम मायलेज देते. या कारमध्ये तुम्हाला 5 लोकांसाठी बसण्याची व्यवस्था मिळते. कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, कारमध्ये 1.2 लिटर इंजिन आहे जे सीएनजी मोडवर 73 एचपी पॉवर आणि 95 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स वापरण्यात आला आहे.
देशातील सर्वात स्वस्त आणि सर्वाधिक विक्री होणारी मायक्रो एसयूव्ही टाटा पंच आहे. त्याची सुरुवातीची किंमत 6 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. त्याच्या सीएनजी रेंजची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7 लाख 30 हजार रुपये आहे.