
Second Hand EV खरेदी करताना 'या' 5 गोष्टींकडे लक्ष द्या
भारतात Electric Car च्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अनेक ऑटो कंपन्या इंधनावर चालणाऱ्या वाहनांसोबतच इलेक्ट्रिक कार सुद्धा ऑफर करत असतात. ग्राहक देखील एक पर्यावरणपूरक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कारकडे पाहत आहे. मात्र, काही ग्राहक सेकंड हॅण्ड इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास जास्त प्राधान्य देतात. चला जाणून घेऊयात की सेकंड हॅन्ड EV खरेदी करताना तुम्ही कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे?
इलेक्ट्रिक कारमध्ये ऑनबोर्ड चार्जर हा एक महत्त्वाचा घटक असतो, जो बॅटरी नियंत्रित पद्धतीने चार्ज करतो. जुन्या EV मध्ये चार्जर कमकुवत किंवा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कारची चार्जिंग हळू हळू होते किंवा पूर्णपणे होत नाही. परिणामी ड्रायव्हिंग रेंज कमी होते. तसेच या गोष्टीकडे वेळीस लक्ष न दिल्यास दुरुस्तीसाठी हजारो रुपयांचा खर्च येऊ शकतो. म्हणून, जुनी इलेक्ट्रिक कार घेताना चार्जर तपासणी आणि टेस्ट चार्जिंग करणे महत्वाचे आहे.
Suzuki ने आणली बायोगॅसवर चालणारी Victoris, ‘या’ देशात सादर झाली कार
अनेक EVs मध्ये केबिन तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी PTC हीटर किंवा एअर हीट पंप टेक्नॉलॉजी दिलेले असते. हे महागडे घटक आहेत आणि खराब झाल्यास दुरुस्ती खर्चही मोठा असतो. कार खरेदी करताना हीटिंग आणि कूलिंग सिस्टिम व्यवस्थित चालते का हे पाहणे महत्वाचे. जर वेगळा आवाज किंवा जळण्याचा वास येत असेल, तर कार लगेच EV सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवा.
इलेक्ट्रिक कारमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे बॅटरी. जुनी EV घेताना याची State of Health (SoH) रिपोर्ट जरूर पाहा. काळानुसार बॅटरी सेल्स कमजोर होतात, ज्यामुळे रेंज कमी होते. बॅटरी बदलणे महाग असू शकते. याचा खर्च लाखोंमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे खरेदीपूर्वी बॅटरीची वॉरंटी आणि रिपोर्ट तपासल्याशिवाय व्यवहार करू नका.
गंज लागणे फक्त पेट्रोल कारपुरते मर्यादित नाही; तर EV मध्येही ही समस्या वाढत आहे. जरी आधुनिक EV मध्ये अँटी-रस्ट कोटिंग असले तरी खालील भागात वेळोवेळी जंग लागू शकतो. म्हणूनच खरेदी करताना चेसिस आणि बॅटरी केस खालीपासून तपासा.
10 वर्षांपासून मार्केट आमचंच! Maruti च्या ‘या’ Car ने एक दशकापासून ग्राहकांना ठेवलंय बांधून
साध्या कारच्या तुलनेत थोड्या इलेक्ट्रिक कार जड असतात, कारण त्यात बॅटरी पॅक असतो. त्यामुळे टायरवर जास्त दबाव येतो आणि ते लवकर झिजतात. टायरची ग्रिप, ट्रेड डेप्थ आणि साइडवॉल क्रॅक्स तपासा. जर टायर खराब असतील, तर कारच्या किमतीत डिस्काउंट मागा. तसेच हे EV-रेटेड “Low Rolling Resistance” टायर आहेत का, हे खात्रीने पाहा.