फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. मात्र वाढत्या महागाईनुसार अनेक ऑटो कंपन्यांनी जसे 2025 सुरु झाले तसे कारच्या किमती वाढवल्या. आता नुकतेच देशातील लक्झरी कार उत्पादक कंपनी BMW ने आपल्या कार्सच्या किमती वाढवल्या आहेत.
बीएमडब्ल्यू इंडियाने घोषणा केली आहे की 1 सप्टेंबर 2025 पासून त्यांच्या कार महाग होतील. कंपनीने सर्व मॉडेल्सच्या किमती 3 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी ही कंपनीची तिसरी किंमत वाढ असेल. यापूर्वी जानेवारी आणि एप्रिलमध्येही कंपनीने किमती वाढल्या आहेत. तीन वेळा वाढ केल्यानंतर, बीएमडब्ल्यू कार आतापर्यंत सुमारे 10% महागल्या आहेत.
Lamborghini ने आणली आतापर्यंतची सर्वात Fastest Car, फक्त 2.4 सेकंदमध्येच पकडते 100kmph स्पीड
कंपनीच्या मते, या वाढीचे सर्वात मोठे कारण म्हणजे डॉलर-रुपयातील चढ-उतार, वाहने बनवण्यासाठी साहित्य आणि वाहतुकीचा वाढलेला खर्च आणि सप्लाय चेन समस्या. या सर्वांचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर झाला आहे, ज्याचा भार ग्राहकांवर टाकला जात आहे.
बीएमडब्ल्यूची भारतातील सर्वात परवडणारी कार 2 सिरीज ग्रॅन कूप आहे, ज्याची किंमत 46.90 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. त्याच वेळी, कंपनीच्या हाय-परफॉर्मन्स असलेल्या SUV XM ची किंमत 2.60 कोटी रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.
भारतात बीएमडब्ल्यू अनेक मॉडेल्स विकते. कंपनी स्थानिक पातळीवर 2 सिरीज ग्रॅन कूप, 3 सिरीज लाँग व्हीलबेस, 5 सिरीज लाँग व्हीलबेस, 7 सिरीज, X1, X3, X5, X7, M340i आणि iX1 लाँग व्हीलबेस असे मॉडेल्स त्यांच्या तामिळनाडू प्लांटमध्ये असेंबल करते. त्याच वेळी, काही मॉडेल्स भारतीय बाजारात पूर्णपणे आयात केलेले (सीबीयू म्हणून) उपलब्ध आहेत, ज्यामध्ये i4, i5, i7, i7 M70, iX, Z4 M40i, M2 कूप, M4 कॉम्पिटीशन, M4 CS, M5, M8 कॉम्पिटीशन कूप आणि XM यांचा समावेश आहे.
नवीन Harley-Davidson Street Bob भारतात लाँच, नव्या इंजिनसह मिळणार दमदार फीचर्स
विशेष म्हणजे, किंमत वाढ असूनही, बीएमडब्ल्यू इंडियाच्या विक्रीवर कोणताही लक्षणीय परिणाम झालेला नाही. 2025 च्या पहिल्या सहामाहीत, कंपनीने विक्रमी विक्री नोंदवली आणि दुसऱ्या सहामाहीतही चांगले निकाल मिळण्याची अपेक्षा आहे. हे बीएमडब्ल्यूचा प्रीमियम ग्राहक आधार आणि मजबूत ब्रँड व्हॅल्यू दर्शवते.