Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

नुकतेच BMW जगभरातल्या त्यांच्या 5.75 लाखांपेक्षा जास्त कार्ससाठी रिकॉल जारी केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 12, 2026 | 09:35 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • BMW ही एक लक्झरी ऑटो कंपनी
  • नुकतेच कंपनीकडून 5.75 लाखांपेक्षा जास्त कार्ससाठी रिकॉल जारी
  • इंजिन स्टार्टरमधील खराबीमुळे रिकॉल जारी
नुकतेच जर्मन लक्झरी कार निर्माता BMW ने जगभरातील 5 लाखांहून अधिक कार्स परत मागवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. इंजिन स्टार्टरमध्ये आढळलेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा रिकॉल जाहीर करण्यात आला आहे. या खरबीमुळे वाहनाला आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

इंजिन स्टार्टरमध्ये शॉर्ट सर्किटचा धोका

BMW च्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, इंजिन स्टार्टरमधील इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये कालांतराने जास्त घर्षण होत असल्याचे आढळले आहे. या झिजेमुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत स्टार्टरचा भाग अत्याधिक तापू शकतो. गंभीर स्थितीत चालू असलेल्या वाहनाला आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीने मोठ्या प्रमाणात वाहनांचा रिकॉल जाहीर केला आहे.

MG Majestor साठी Pre Booking सुरु! किती रुपयात बुक करता येईल एसयूव्ही? केव्हा मिळणार डिलिव्हरी? जाणून घ्या

कोणती मॉडेल्स प्रभावित?

जुलै 2020 ते जुलै 2022 दरम्यान तयार करण्यात आलेल्या 16 वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये ही समस्या आढळली आहे. सुमारे 5.75 लाख कार्स प्रभावित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये BMW 2 सिरीज, 3 सिरीज, 4 सिरीज, 5 सिरीज आणि 7 सिरीजचा समावेश आहे. तसेच X4, X5, X6 आणि Z4 यांसारखी लोकप्रिय SUV आणि स्पोर्ट्स मॉडेल्सही या यादीत आहेत.

वाहनधारकांसाठी कंपनीचा सल्ला काय?

BMW ने सर्व ग्राहकांना इंजिन सुरू केल्यानंतर, विशेषतः रिमोट स्टार्ट फीचर वापरताना, वाहन विनानिगराणी सोडू नये असा सल्ला दिला आहे. कंपनी लवकरच प्रभावित ग्राहकांना अधिकृत पत्राद्वारे माहिती देणार आहे. दोषपूर्ण इंजिन स्टार्टर विनामूल्य बदलून देण्यात येईल, त्यामुळे ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही.

Skoda Slavia Facelift लवकरच लाँच होण्याच्या तयारीत, टेस्टिंग दरम्यान मिळाली ‘ही’ माहिती

BMW समोरील नवे आव्हान

ही पहिलीच वेळ नाही की BMW ला इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांचा रिकॉल करावा लागत आहे. यापूर्वी 2024 मध्ये ब्रेक सिस्टीममधील बिघाडामुळे कंपनीने सुमारे 15 लाख गाड्या परत मागवल्या होत्या. मात्र, यावेळच्या रिकॉलचा कंपनीच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
जर तुमच्याकडे या यादीतील कोणतेही मॉडेल असेल, तर कंपनीकडून मिळणाऱ्या सूचनेकडे लक्ष द्या आणि शक्य तितक्या लवकर अधिकृत सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधा.

Web Title: Bmw recall announced for more than 5 lakh cars due to engine starter fault

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • BMW
  • Car

संबंधित बातम्या

RC बुकवरील ‘इंजिन नंबर’ आणि ‘चेसिस नंबर’ का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या
1

RC बुकवरील ‘इंजिन नंबर’ आणि ‘चेसिस नंबर’ का महत्त्वाचे आहेत? सविस्तरपाने जाणून घ्या

RC बुक हरवले तर काय करावे? ‘डुप्लिकेट RC’ मिळवण्याची ऑनलाईन व ऑफलाईन सोपी प्रक्रिया काय आहे?
2

RC बुक हरवले तर काय करावे? ‘डुप्लिकेट RC’ मिळवण्याची ऑनलाईन व ऑफलाईन सोपी प्रक्रिया काय आहे?

किया इंडियाने लाँच केले सेल्टोसचे २ नवीन व्हेरिएंट्स; २१.५६ लाख रुपयांपासून किंमत सुरू!
3

किया इंडियाने लाँच केले सेल्टोसचे २ नवीन व्हेरिएंट्स; २१.५६ लाख रुपयांपासून किंमत सुरू!

CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाचे! दर तीन वर्षांनी CNG सिलेंडरची ‘हायड्रो-टेस्टिंग’ करणे अनिर्वार्य! ‘हे’ चुकवले तर बेतू शकते जीवावर
4

CNG वाहनधारकांसाठी महत्त्वाचे! दर तीन वर्षांनी CNG सिलेंडरची ‘हायड्रो-टेस्टिंग’ करणे अनिर्वार्य! ‘हे’ चुकवले तर बेतू शकते जीवावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.