फोटो सौजन्य: @Lamborghini (X.com)
भारत असो की विदेश, प्रत्येक देशात सुपरकार्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रेटी आणि मोठमोठे उद्योजकांकडे आलिशान आणि सुपरकार पाहायला मिळतात. खरंतर जेव्हा कधी सुपरकारचा विषय निघतो, तेव्हा आपसूकच लॅम्बोर्गिनीचे नाव समोर येते. कंपनीच्या अनेक कार भारतासह जागतिक मार्केटमध्ये चांगल्याच लोकप्रिय आहे. नुकतेच कंपनीने त्यांची आतापर्यंतची वेगवान कार सादर केली आहे.
लॅम्बोर्गिनीनेच्या Monterey Car Week 2025 मध्ये मर्यादित व्हर्जनची फेनोमेनो सुपरकार सादर केली. ही कार सादर करताना, इटालियन कंपनीने दावा केला की फेनोमेनोमध्ये आतापर्यंतचे सर्वात पॉवरफुल V12 इंजिन देण्यात आले आहे. ही कार अनेक उत्तम फीचर्ससह जगासमोर सादर करण्यात आली आहे. लॅम्बोर्गिनी फेनोमेनोच्या लिमिटेड एडिशनबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
उद्या नवीन Hero Glamour 125 होणार लाँच, ‘या’ नवीन गोष्टी मिळू शकतात पाहायला
लॅम्बोर्गिनीच्या नावाच्या वारशाला अनुसरून, “फेनोमेनो” हे नाव 2002 मध्ये मेक्सिकोतील मोरेलिया येथे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एका धाडसी आणि प्रसिद्ध बैलाला श्रद्धांजली वाहते. लिमिटेड एडिशनच्या लॅम्बोर्गिनी फेनोमेनोच्या फक्त 30 युनिट्सची निर्मिती केली जाईल, त्यापैकी 29 युनिट्स ग्राहकांना उपलब्ध असतील.
लॅम्बोर्गिनी फेनोमेनोमध्ये 6.5-लिटर NA V12 इंजिन वापरले गेले आहे, जे Lamborghini Revuelto मध्ये देखील पाहिले गेले आहे. त्याचे इंजिन ड्युअल-क्लच आठ-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की यात सुपरकारमध्ये कंपनीचे सर्वात पॉवरफुल V12 इंजिन आहे. हे इंजिन एकूण 1,065 एचपी पॉवर जनरेट करते. त्यापैकी 823 एचपी पॉवर एस्पिरेटेड V12 इंजिनद्वारे जनरेट केली जाते आणि उर्वरित 242 एचपी पॉवर तीन इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे जनरेट केली जाते.
Lamborghini Fenomeno फक्त 2.4 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी आणि 6.7 सेकंदात 0 ते 200 किमी/ताशी स्पीड पकडू शकते. याचा टॉप स्पीड 350 किमी/ताशी आहे.
नवीन Harley-Davidson Street Bob भारतात लाँच, नव्या इंजिनसह मिळणार दमदार फीचर्स
लॅम्बोर्गिनी फेनोमेनोच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, त्यात एरोनॉटिक्स-प्रेरित चेसिस आहे, ज्यामध्ये मोनोकोक पूर्णपणे मल्टी-टेक्नॉलॉजी कार्बन फायबरपासून बनलेला आहे. त्याच्या पुढच्या डिझाइन बनावट कंपोझिटपासून बनलेली आहे. या सुपरकारमध्ये CCM-R प्लस ब्रेक सिस्टमसह कार्बन-सिरेमिक डिस्क आहेत, जे ट्रॅक आणि रस्त्यावर असाधारण ब्रेकिंगसाठी आहेत.