फोटो सौजन्य: iStock
देशात मोठ्या प्रमाणात बाईक विक्री होत आहे. आज जरी कित्येक जण बजेट फ्रेंडली बाईक्स खरेदी करत असले तरी त्यांचे स्वप्न असते की हाय परफॉर्मन्स असणाऱ्या बाईक राइड करण्यास मिळावी. देशात हाय परफॉर्मन्स बाईकची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. हीच क्रेझ पाहता भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात हाय परफॉर्मन्स बाईक उत्पादित करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. यातीलच एक कंपनी म्हणजे हार्ले डेव्हिडसन.
आज कित्येक बाईकप्रेमी तरुणांना हार्ले डेव्हिडसनच्या बाईक्सची भुरळ पडली असते. रस्त्यावरून या कंपनीच्या बाईक दिसल्या की अनेक जणांच्या नजर त्यावर रोखल्या जातात. याव्यतिरिक्त कित्येक हार्ले डेव्हिडसन बाईक खरेदी करण्याचे स्वप्न मनाशी बाळगत असतात. नुकतेच भारताचे बजेट सादर झाले. यात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे आता हार्ले डेव्हिडसनच्या बाईक्सची किंमत कमी होणार आहे.
कारच्या डिकीत चुकूनही ठेवू नका ‘ही’ गोष्ट ! कोणत्याही वेळी होऊ शकतो धमाका
२०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात उच्च-क्षमतेच्या बाईक्सवरील इम्पोर्ट ड्युटीत लक्षणीय घट करण्यात आल्याने, हार्ले-डेव्हिडसन सारख्या अमेरिकन ब्रँडसह आयात केलेल्या बाईक्स आता भारतात स्वस्त होणार आहेत.
हार्ले-डेव्हिडसन टॅरिफ हा भारत आणि अमेरिका यांच्यातील अनेक वर्षांपासून वादाचा मुद्दा आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थसंकल्पातील घोषणेनंतर, उच्च क्षमतेच्या बाईक खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना निश्चितच काहीसा दिलासा मिळाला आहे.
1600 सीसी पर्यंत इंजिन क्षमता असलेल्या बाईकवरील इम्पोर्ट ड्युटी, जे कम्प्लिट बिल्ट युनिट्स (CBU) म्हणून आयात केले जातात, आता ५० टक्क्यांवरून ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे, जो एक मोठा दिलासा आहे. ज्यामुळे आता हाय परफॉर्मन्स बाईक खरेदी करणे सोपे होणार आहे.
1600 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या इंजिन असलेल्या बाईक्ससाठी, ही कपात आणखी जास्त आहे. या बाईक्सच्या इम्पोर्ट ड्युटीला ५० टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.
Yamaha Lander 250 VS Kawasaki KLX 230: इंजिन आणि फीचर्सच्या बाबतीत कोणती बाईक आहे बेस्ट?
याव्यतिरिक्त, सेमी-नॉक्ड डाउन (SKD) किट्सवरील इम्पोर्ट ड्युटी २५ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे आणि पूर्णपणे नॉक्ड डाउन (CKD) युनिट्सवर आता १५ टक्क्यांवरून १० टक्के कर आकारला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा ऑटोमोबाईल उद्योगासाठी दिलासादायक ठरला आहे.
या टॅरिफ कपातीमुळे, भारतातील हार्ले-डेव्हिडसन बाईक्सच्या किंमती लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे. परिणामी, अधिकाधिक लोक ही बाईक खरेदी करू शकतील आणि विक्री वाढल्याने कंपनीलाही त्याचा फायदा होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन वस्तूंवर जास्त कर लादणाऱ्या देशांवर परस्पर कर लादण्याची धमकी दिल्यानंतर इम्पोर्ट केलेल्या बाईक्सवरील कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.