आपली स्वतःची कार खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आज कार लोन आणि EMI सारख्या सुविधांच्या साहाय्याने कित्येकांचे कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. पण कार खरेदी करण्यापेक्षा तिला मेंटेन करणे अधिक कठीण असते. अनेकवेळा काही चुकांमुळे पुढे मोठा अपघात होण्याची शक्यता असते. यातीलच एक कॉमन चूक म्हणजे कारच्या डिकीत काही अशी गोष्ट ठेवणे जे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
कारच्या डिकीत खालील गोष्टी ठेवणे टाळा (फोटो सौजन्य: iStock)
बॅटरी: चुकूनही कारच्या डिकीत बॅटरी ठेवू नका; उष्णतेमुळे बॅटरीला आग लागू शकते किंवा तिचा मोठा स्फोट होऊ शकतो.
जास्त दबाव असणारे कंटेनर: प्रोपेन, ब्युटेन आणि इतर प्रेशराइज्ड कंटेनर कारच्या डिकीत ठेवू नयेत. उष्णतेच्या संपर्कात आल्यास या कंटेनरचे स्फोट होऊ शकतात.
इलेकट्रोनिक्स उपकरणे: चुकूनही इलेक्ट्रॉनिक उपकरणे कारच्या डिकीत ठेवू नयेत, ज्यात बॅटरी असते. बॅटरीचा वापर करणारे इलेकट्रोनिक उपकरणे डिकीत ठेवणे धोकादायक ठरू शकते.
विस्फोटक गोष्टी: कारच्या डब्यात फटाके, गनपावडर आणि इतर स्फोटक पदार्थ ठेवू नयेत. उष्णतेच्या संपर्कात आल्यावर या पदार्थांचा स्फोट होऊ शकतात.
ज्वलनशील गोष्टी: पेट्रोल, डिझेल, गॅस आणि इतर ज्वलनशील गोष्टीत कारच्या डिकीत ठेवू नयेत. उष्णतेच्या संपर्कात आल्यावर या गोष्टी आग पकडू शकतात.