फोटो सौजन्य: Social Media
चीन हा आपला शत्रू राष्ट्र जरी असला तरी एक गोष्ट आपण मानली पाहिजे ते म्हणजे त्यांचे आधुनिक तंत्रज्ञान. आज भारतीय मार्केटमध्ये आपल्या अनेक गोष्टींवर ‘मेड इन चायना’ चा टॅग दिसत असतो. भारतीय सरकार याच मेड इन चायना प्रॉडक्ट्सला हद्दपार करण्यासाठी मेड इन इंडिया प्रॉडक्ट्सला प्राधान्य द्या असे आवाहन भारतीय ग्राहकांना करत आहे, ज्याला भारतीयांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. पण चीनचे काही असे ब्रॅण्ड्स देखील आहेत, जे भारतीयच नाही तर ग्लोबल मार्केटमध्ये आपला ठसा उमटवीत आहे. BYD हे त्यातीलच एक नाव. आता BYD या चिनी ऑटो कंपनीने एक भन्नाट कार मार्केटमध्ये आणली आहे.
BYD ने आता एक अशी कार मार्केटमध्ये आणली आहे, जी चक्क खड्डा दिसल्यावर उडी मारते. BYD Yangwang U9 असे या कारचे नाव आहे. एलोन मस्कची टेस्ला देखील अद्याप अशी तंत्रज्ञान तयार करू शकलेली नाही, ज्यामध्ये तुमची कार रस्त्यावरील खड्ड्यावरून उडी मारू शकेल. रस्त्यावर खिळे लावले असले तरी ही BYD कार अचूकरीत्या त्यावरून उडी मारते. विक्री आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत टेस्लाशी स्पर्धा करणारी चिनी ऑटो कंपनी BYD ने अलीकडेच CES 2025 मध्ये आपली इलेक्ट्रिक सुपरकार प्रदर्शित केली आहे.
BYD ची ही कार जास्त वेगात असताना देखील ६ मीटर पर्यंत उडी मारू शकते. याचा अर्थ असा की ही कार रस्त्यावरील मोठे खड्डे किंवा इतर कोणताही अडथळा ओलांडू शकते. एखादी गाडी एक्सप्रेस वेवर जास्त वेगाने जात असेल आणि तेव्हाच कोणत्याही प्रकारचा अडथळा आला तर अचानक ब्रेक लावणे गाडीसाठी हानिकारक ठरू शकते. अशावेळी या BYD कारमधील तंत्रज्ञान मोठा अपघात होण्यापासून थांबवू शकते.
It was only Day 1 of CES 2025.
And the announcements are already mind blowing.
10 wild reveals:
1. BYD’s supercar Yangwang U9 jumping 6 meters forward using “jumping suspension”pic.twitter.com/2BluWVaKaQ
— Min Choi (@minchoi) January 7, 2025
BYD Yangwang U9 ची ही तंत्रज्ञान रस्त्याचे आपोआप विश्लेषण करते आणि त्यावरील खड्डे, खिळे इत्यादी ओळखते. त्या आधारावर ही कार हवेत उडी मारते. या कारमधील तंत्रज्ञान १ टन पेक्षा जास्त शक्तीने कारला हवेत उचलते आणि बराच वेळ कार हवेत ठेवते.
Auto Expo 2025 मध्ये नवीन कार दिसतीलच, पण लक्ष असेल Hero Motocorp च्या ‘या’ बाईक्सवर
BYD Yangwang U9 हे e4 प्लॅटफॉर्मवर विकसित केले गेले आहे. या कारमध्ये कंपनीने DiSus-X इंटेलिजेंट बॉडी कंट्रोल सिस्टम दिली आहे, जी अनेक अनोखे फीचर्स देते. कंपनीने या कारमध्ये ४ वेगवेगळ्या इलेक्ट्रिक मोटर्स दिल्या आहेत, जे चारही चाकांसाठी स्वतंत्रपणे टॉर्क कंट्रोल करण्याचे काम करतात.