फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या अनेक वर्षांपासून उत्तम बाईक्स आणि स्कूटर ऑफर करत आहे. आता देशातील सर्वात मोठा ऑटोमोटिव्ह इव्हेंट येत्या 17 जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. या ऑटो एक्स्पोमध्ये अनेक वाहन उत्पादक कंपन्या सहभागी होणार आहे. त्यामुळेच ऑटो इंडस्ट्रीतील अनेक व्यक्तींचे या एक्स्पोकडे लक्ष असणार आहे.
या ऑटो एक्सपोमध्ये अनेक दमदार आणि हाय परफॉर्मन्स कारची पहिली झलक पाहायला मिळणार आहे. देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्प देखील या ऑटोमोटिव्ह इव्हेंटमध्ये आपल्या काही बाईक्स सादर करणार आहे. तसेच काही बाईक लाँच करण्याची तयारी देखील कंपनी करत आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या बाईक या ऑटो एक्सपोमध्ये दिसणार आहेत.
हीरो मोटोकॉर्प ऑटो एक्स्पो 2025 दरम्यान हीरो झूम 160आर स्कूटर लाँच करू शकते. कंपनीने अद्याप याबद्दल अधिकृतपणे माहिती दिलेली नाही परंतु ती ऑटो एक्स्पो 2025 मध्ये लाँच केली जाईल अशी अपेक्षा आहे. ही स्कूटर EICMA २०२३ मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. ही बाईक १.५० लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीच्या आसपास आणली जाऊ शकते.
हीरोची नवीन एक्सपल्स २१० देखील ऑटो एक्स्पो 2025 मध्ये लाँच केली जाऊ शकते. ही २१० सीसी DOHC लिक्विड कूल्ड इंजिनने सुसज्ज आहे, जे ते २४.५ bhp ची पॉवर आणि २०.४ न्यूटन मीटर टॉर्क देईल. या बाईकमध्ये पुढील बाजूस २१० मिमी आणि मागील बाजूस २०५ मिमी सस्पेंशन, स्विचेबल एबीएस मोड्स, ६-स्पीड गिअरबॉक्स, स्लिपर आणि असिस्ट क्लच, २२० मिमी ग्राउंड क्लिअरन्स, ४.२ इंच टीएफटी स्पीडोमीटर असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. त्याची अपेक्षित एक्स-शोरूम किंमत सुमारे १.५० लाख रुपये असू शकते.
या बाईकमध्ये २५० सीसी क्षमतेचे DOHC 4V लिक्विड कूल्ड इंजिन आहे. ज्यामुळे बाईकला ३० पीएसची पॉवर आणि २५ न्यूटन मीटरचा टॉर्क मिळेल. तसेच, रेसिंग बाईक्सपासून प्रेरित विंगलेट्ससह त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बाईकमध्ये ६-स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. स्विचेबल एबीएस मोड्समुळे राईड सुधारली आहे. बाईकमध्ये एलईडी लाईट्स, एलईडी डीआरएलसह अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत.
EICMA 2024 मध्ये, Hero ने 250 सीसी सेगमेंटमध्ये Hero Xtreme 250 ही नेकेड बाईक म्हणून सादर केली होती. यात 250 सीसी क्षमतेचे DOHC 4 व्हॉल्व्ह इंजिन आहे. ज्यामुळे बाईकला ३० पीएसची पॉवर आणि २५ न्यूटन मीटरचा टॉर्क मिळेल. बाईकमध्ये USD फ्रंट सस्पेंशन आणि मागील बाजूस 6-स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन आहे. या बाईकमध्ये स्विचेबल एबीएस मोड्स, एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट, एलईडी डीआरएल, लॅप टाइमर आणि ड्रॅग टाइमरसह टीबीटी नेव्हिगेशन आणि म्युझिक कंट्रोल असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
हिरो मोटोकॉर्प इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये विडा ऑफर करते. कंपनी ऑटो एक्स्पो २०२५ दरम्यान विडा अंतर्गत झेड स्कूटर देखील लाँच करू शकते.