Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार खरेदीदारांसाठी मोठी बातमी! CAFE-3 नियमांमुळे वाढणार मायलेज, काय बदलणार जाणून घ्या?

CAFE-3 : या मसुद्यात प्रथमच कार्बन न्यूट्रल इंधनालाही महत्त्व देण्यात आले आहे. इथेनॉल, जैवइंधन आणि संकुचित जैवगॅसवर चालणाऱ्या वाहनांना विशेष लाभ मिळू शकतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 18, 2026 | 02:29 PM
CAFE-3 (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

CAFE-3 (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

देशात वाढते प्रदूषण आणि इंधनाचा जास्त वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने वाहन क्षेत्रासाठी नवीन CAFE 3 नियमांचा मसुदा जाहीर केला. या नियमांचा मुख्य उद्देश कमी इंधनात जास्त अंतर कापणारी आणि कमी प्रदूषण करणारी वाहने रस्त्यावर आणणे हा आहे. हे नियम 1 एप्रिल 2027 पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या सरकारने या मसुद्यावर वाहन कंपन्या, तज्ज्ञ आणि नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत.

CAFE म्हणजे वाहन कंपन्यांनी तयार केलेल्या सर्व वाहनांच्या सरासरी इंधन कार्यक्षमतेचे मोजमाप. म्हणजेच एका गाडीवर नियम लागू होणार नाही. तर कंपनीच्या संपूर्ण वाहन ताफ्याचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे कंपन्यांना आधिक आधुनिक आणि इंधनाची बचत करणारी वाहने तयार करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

इंधन वापर कमी करण्याचे लक्ष्य निश्चित

नवीन नियमांमध्ये इंधन वापर कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने कठोर उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. पुढील काही वर्षात वाहनांचा सरासरी इंधन वापर कमी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यादरम्यान पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून राहण्याची शक्यता कमी होईल. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जनही घटेल. CAFE-3

हे नियम मुख्यतः एम-1 श्रेणीतील प्रवासी वाहनांना लागू असतील. चालकाव्यतिरिक्त जास्तीत जास्त आठ प्रवाशांची क्षमता असलेल्या कार आणि एसयूव्ही या श्रेणीत येतात. 2027 ते 2032 या कालावधीत तयार होणाऱ्या किंवा भारतात विक्रीसाठी आयात होणाऱ्या वाहनांवर हे नियम लागू होतील.

Electric Scooter Fire : इलेक्ट्रिक स्कूटर वापरताय? बॅटरी स्फोटामागील ‘ही’ 7 प्रमुख कारणं जाणून घ्या…

इंधनामुळे प्रदूषण कमी 

या मसुद्यात प्रथमच कार्बन न्यूट्रल इंधनालाही महत्त्व देण्यात आले आहे. इथेनॉल, जैवइंधन आणि संकुचित जैवगॅसवर चालणाऱ्या वाहनांना विशेष लाभ मिळू शकतो. अशा इंधनामुळे प्रदूषण कमी होत असल्याने वाहन उत्पादकांना त्याचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

याशिवाय, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या वाहनांनाही फायदा मिळेल. इलेक्ट्रिक कार, प्लग-इन हायब्रीड, स्ट्राँग हायब्रीड आणि फ्लेक्स फ्युएल वाहनांना अतिरिक्त सवलती आणि विशेष क्रेडिट्स देण्याची योजना सरकारने ठेवली आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक वाहनांच्या उत्पादनाला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.

विशेष क्रेडिट्स मिळतील

सरकारने या नियमांमध्ये क्रेडिट प्रणालीचाही समावेश केला आहे. एखाद्या कंपनीने सरकारने ठरवलेल्या उद्दिष्टांपेक्षा चांगली कामगिरी केली तर तिला विशेष क्रेडिट्स मिळतील. ही क्रेडिट्स पुढील काळात वापरता येतील किंवा गरज असल्यास दुसऱ्या कंपनीसोबतही वापरण्याची सुविधा असेल. लक्ष्य पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांना हे क्रेडिट्स खरेदी करण्याचाही पर्याय उपलब्ध राहणार आहे.

या क्रेडिट्ससाठी सुरुवातीला ठराविक शुल्क आकारले जाईल आणि त्यात दरवर्षी वाढ होणार आहे. मात्र वेळेत क्रेडिट्सचा वापर केला नाही तर ते रद्द होतील. त्यामुळे वाहन कंपन्यांना योग्य नियोजन करून नियमांचे पालन करावे लागेल.

Volvo: व्हॉल्वोच्या ५ सर्वात आलिशान आणि सुरक्षित कार्स, ज्या देतात ड्रायव्हिंगचा प्रीमियम अनुभव!

दंडात्मक कारवाई होऊ शकते

जे उत्पादक सतत नियमांकडे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. मात्र ज्या कंपन्यांची वार्षिक विक्री एक हजार वाहनांपेक्षा कमी आहे, त्यांना काही प्रमाणात सूट देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

या नव्या धोरणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे देशात स्वच्छ आणि इंधन बचत करणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन मिळेल. ग्राहकांनाही कमी इंधन खर्चात अधिक चांगली कामगिरी करणारी वाहने मिळण्याची शक्यता आहे. पर्यावरणाचे संरक्षण, इंधनाची बचत आणि आधुनिक वाहन तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी CAFE 3 नियम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आता या मसुद्यावर येणाऱ्या सूचनांनंतर अंतिम नियम कसे असतील, याकडे वाहन उद्योगासह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.

Web Title: Cafe 3 norms to boost mileage what will change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • best car
  • E20 Fuel

संबंधित बातम्या

Pure Petrol Rate: E20 इंधनाला विरोध करणाऱ्यांना झटका; 100% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा 168 रुपये लीटर! गडकरींकडून खुलासा
1

Pure Petrol Rate: E20 इंधनाला विरोध करणाऱ्यांना झटका; 100% शुद्ध पेट्रोल हवंय? मग मोजा 168 रुपये लीटर! गडकरींकडून खुलासा

E20 वर मान्सूनचं संकट! पावसाच्या ओलाव्यामुळे एथेनॉल – पेट्रोल होतंय वेगळं? पेट्रोल पंप असोसिएशनने दिला गंभीर इशारा?
2

E20 वर मान्सूनचं संकट! पावसाच्या ओलाव्यामुळे एथेनॉल – पेट्रोल होतंय वेगळं? पेट्रोल पंप असोसिएशनने दिला गंभीर इशारा?

‘रस्त्याच्या मध्येच…’ यूट्यूबर मनीष कश्यप यांच्यानंतर E20 पेट्रोलवर ‘या’ व्यावसायिकाने  उपस्थित केला प्रश्न
3

‘रस्त्याच्या मध्येच…’ यूट्यूबर मनीष कश्यप यांच्यानंतर E20 पेट्रोलवर ‘या’ व्यावसायिकाने उपस्थित केला प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.