Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car-Bike Insurance: कार-बाईकचा Insurance काढताय? आधी जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी, नाहीतर Claim अडकू शकतो

Car-Bike Insurance: गाडीचा विमा काढताना केवळ कमी प्रीमियम पाहणे किंवा एजंटने सांगितलेली पॉलिसी घेणे पुरेसे नाही. या रिपोर्टनुसार विमा घेताना कंपनीची विश्वासार्हता, कॅशलेस गॅरेज आणि क्लेम प्रक्रियेबरोबरच वेगवेगळ्या कंपन्यांच्या पॉलिसींची तुलना करणे महत्त्वाचे आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 04, 2026 | 11:40 AM
Car-Bike Insurance (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Car-Bike Insurance (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • फक्त स्वस्त प्रीमियम न पाहता कंपनीची विश्वासार्हता, कव्हरेज आणि कॅशलेस गॅरेज तपासा.
  • सेकंड हँड गाडी घेतल्यावर विमा जुन्या मालकाच्या नावावर न ठेवता स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करा.
  • विमा फॉर्ममध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती देऊ नका; अन्यथा क्लेम रद्द होऊ शकतो.
Online Vehicle Insurance: आजच्या काळात गाडी असणं गरजेचं झालं आहे. त्यापेक्षा अधिक महत्वाचे की, त्या गाडीचा विमा काढून घेणे. सध्या अपघाताच्या संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळते. भारतात गाडीला विमा असणं कायद्याने बंधनकारक आहे. विमा नसेल तर दंड भरावा लागतो. पण हा फक्त कायद्याचा विषय नाही. रस्त्यावर अपघात झाला, गाडी चोरीला गेली किंवा काही नुकसान झालं तर लाखो रुपयांचा भुर्दंड पडतो. Car-Bike Insurance:

त्यातून वाचण्यासाठी विम्याची गरज भासते. पण बऱ्याच जणांना विमा काढताना काय काळजी घ्यायची हेच माहिती नसतं. घाईघाईत विमा काढतात आणि जेव्हा खरंच गरज लागते तेव्हा कंपनी क्लेम नाकारते. मग खिशातून पैसे द्यावे लागतात. म्हणून विमा काढताना या गोष्टी 5 चुका टाळाव्या.

1. फक्त स्वस्त विमा शोधणे ही सगळ्यात मोठी चूक

बऱ्याच लोकांचं एकच असतं, सगळ्यात स्वस्त विमा कोणता आहे? कमीत कमी प्रीमियम भरणारा विमा ते घेतात. पण हीच सगळ्यात मोठी चूक आहे.कमी पैशात विमा देणाऱ्या कंपन्या बऱ्याच गोष्टींना कव्हरच करत नाहीत. वरवर स्वस्त वाटतं पण अपघात झाला की कळतं की यात तर काहीच मिळत नाही.

तसेच काही कंपन्या कमी प्रीमियम घेतात पण क्लेम देताना खूप त्रास देतात, महिने महिने फिरवतात असे होऊ नये म्हणून फक्त प्रीमियम बघू नका, कंपनी किती जुनी आहे. तिची विश्वासार्हता काय आहे, कॅशलेस गॅरेज किती आहेत, क्लेम लवकर पास करते का, हे सगळं बघूनच विमा घ्या.

2. दुसऱ्या कंपन्यांशी तुलना न करणे

आजकाल सगळं ऑनलाईन असताना पण लोक एकाच एजंटकडे जातात आणि त्याने सांगितलेला विमा घेतात. बाजारात काय दुसरे पर्याय आहेत हेच बघत नाही विमा घेण्याआधी किंवा जुना विमा रिन्यू करण्याआधी 4-5 कंपन्यांचे प्लॅन एकदा ऑनलाईन चेक करा. प्रत्येक कंपनी वेगवेगळे ऑफर देते, वेगवेगळे फायदे देते. तुलना केली तर कळेल की कमी पैशात जास्त चांगलं कव्हरेज कुठे मिळतंय. दोन मिनिटांचं काम आहे परंतू हजारो रुपये वाचू शकतात.

Best Electric Scooters: ऑक्टोबरमध्ये Electric Scooter घ्यायचीये? ‘या’ 5 दमदार e-Scooters वर टाका नजर, किंमत-रेंज जाणून घ्या

3. ऑनलाईन विमा महाग असतो हा गैरसमज

अनेकांना वाटतं की एजंटकडून ऑफलाईन विमा घेतला तर स्वस्त पडू शकेल मात्र, खरं तर उलटं आहे. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन विमा घेता त्यावेळेस कंपनीला एजंटला कमिशन द्यावं लागत नाही. ऑफिसचा खर्च वाचतो. त्यामुळे तीच कंपनी तुम्हाला ऑनलाईन कमी किमतीत जास्त चांगला विमा देते. ऑनलाईनवर डिस्काउंट आणि एक्स्ट्रा ऑफर पण जास्त असतात. त्यामुळे ऑफलाईन घेण्याआधी एकदा ऑनलाईन किंमत नक्की बघा.

4. सेकंड हँड गाडी घेतल्यावर विमा नावावर न करणे

जुनी गाडी घेणारे लोक इथे सगळ्यात जास्त फसतात. गाडी घेतली की फक्त RTO मध्ये नावावर करतात आणि झाले असे समजतात. पण विम्याचं काय?RTO मध्ये गाडी नावावर केली म्हणजे काम संपलं नाही.

जुन्या मालकाच्या नावावर असलेला विमा तुम्हाला 14 दिवसाच्या आत तुमच्या नावावर करून घ्यावा लागतो. जर विमा जुन्याच मालकाच्या नावावर राहिला आणि तुमच्या हातून अपघात झाला तर कंपनी एक रुपयाही देणार नाही. ती म्हणेल विमा तुमच्या नावावरच नाही. मग सगळा खर्च तुम्हाला स्वतः करावा लागेल. म्हणून सेकंड हँड गाडी घेतली की आधी विमा ट्रान्सफर करा.

5. फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरणे

प्रीमियम कमी यावा म्हणून किंवा नकळतपणे लोक फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरतात. पत्ता चुकीचा, गाडीचं मॉडेल चुकीचं, किंवा गाडीला CNG किट बसवलंय हे लपवतात.विमा हा विश्वासाचा करार आहे. तुम्ही दिलेली प्रत्येक माहिती खरी असली पाहिजे. तुमचं नाव, पत्ता, इंजिन नंबर, चेसिस नंबर, गाडीचा वापर तुम्ही खाजगी करता की कमर्शियल, हे सगळं खरं खरं लिहा. जर तुम्ही काही लपवलं आणि नंतर कंपनीला कळलं तर तुमचा क्लेम पूर्णपणे रद्द होऊ शकतो.

Ola Uber चालवून मोठी कमाई करायचीय? ‘या’ मायलेज किंग CNG Cars ठरतील सर्वोत्तम पर्याय

त्यासोबतच फक्त बेसिक विमा घेऊ नका. झिरो डेप, इंजिन प्रोटेक्शन, रोडसाईड असिस्टन्स सारखे ॲड-ऑन घ्या. थोडे जास्त पैसे लागतील पण गरजेच्या वेळी हेच वाचवतील.लक्षात ठेवा, योग्य माहिती घेऊन काढलेला विमाच खऱ्या अडचणीत तुमची ढाल बनतो.

Web Title: Car bike insurance 5 mistakes claim rejection rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • auto mobile
  • auto mobile news
  • bike
  • Insurance
  • Vehicle insurance

संबंधित बातम्या

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड
1

तडीपार असूनही पुण्यात लपून राहत होता; बायकोला सोबत घेतली अन् दुचाकी चोरीचा धक्कादायक प्रकार उघड

बजाजची नवी 250cc अ‍ॅडव्हेंचर बाईक येतेय; Xpulse 210 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?
2

बजाजची नवी 250cc अ‍ॅडव्हेंचर बाईक येतेय; Xpulse 210 ला मिळणार नवा प्रतिस्पर्धी?

Gold Insurance : घरी ठेवलेलं सोनं चोरीला गेलं तर? जाणून घ्या दागिन्यांचा विमा कसा उतरवायचा; मिळतील ‘हे’ फायदे
3

Gold Insurance : घरी ठेवलेलं सोनं चोरीला गेलं तर? जाणून घ्या दागिन्यांचा विमा कसा उतरवायचा; मिळतील ‘हे’ फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.