Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Theft Racket: गोव्यातील कॅसिनोची ‘हौस’ अन् इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याची ‘चोरी’; कोल्हापूर पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस!

Theft Racket: गोव्यात जुगार अन् उधळपट्टी; इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याने रचला १६ दुचाकींच्या चोरीचा कट! "गाड्या चोरीला अन् नंबर प्लेट स्वतःची..." नंबर प्लेट बदलून करायचा असा बनाव... पोलिसांनी कशी केली धडक कारवाई?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 18, 2026 | 01:55 PM
Theft Racket: गोव्यातील कॅसिनोची 'हौस' अन् इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याची 'चोरी'; कोल्हापूर पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस!

Theft Racket: गोव्यातील कॅसिनोची 'हौस' अन् इचलकरंजीच्या फळ विक्रेत्याची 'चोरी'; कोल्हापूर पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस!

Follow Us
Follow Us:
  • कॅसिनोच्या नादात फळ विक्रेत्याने १६ दुचाकी चोरल्या
  • गाड्या गहाण ठेवून मिळणाऱ्या पैशांची तो गोव्यात उधळपट्टी करायचा
  • पोलिसांनी ४.२० लाखांच्या १६ मोपेड जप्त केल्या
Theft Racket: गोव्यातील आलिशान कॅसिनोमध्ये जुगार खेळण्याचे व्यसन आणि पैशांची उधळपट्टी करण्यासाठी एका तरुणीने अत्यंत धक्कादायक आणि गुन्हेगारी पाऊल उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. इचलकरंजी शहरातील एका फळ विक्रेत्याने वर्षभरात तब्बल १६ दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून, शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील १६ वाहनचोरीचे गुन्हे उलगडले आहेत.

हेही वाचा: Fraud Case: निवृत्त होताच नर्सने रचला ५३ लाखांचा महाघोटाळा! गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून सहकारी नर्सनाच गंडवले!

सीसीटीव्ही फुटेजमुळे पर्दाफाश..

इचलकरंजी शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. २८ ऑक्टोबर रोजी यशवंत कॉलनी परिसरातील रहिवासी अल्ताफ सद्दाम सनदी यांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून लांबवली गेली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास वेगाने सुरू केला. तपासादरम्यान, शाहूपुतळा परिसरातील फळ विक्रेता प्रदीप बाळू मस्के (वय २४, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) याने ही दुचाकी चोरल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संशयित मस्के याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने यशवंत कॉलनीतील दुचाकी चोरीची कबुली दिली.

कॅसिनोचे व्यसन अन् गुन्ह्याची अनोखी शक्कल..

तपासात समोर आलेली माहिती अधिक धक्कादायक होती. संशयित आरोपी प्रदीप मस्के हा मागील वर्षभरापासून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय होता. तो सुझुकी बर्गमॅन व होंडा ॲक्टिव्हा अशा स्वतः वापरत असलेल्या कंपनीच्या दुचाकींचीच शक्यतो चोरी करायचा. चोरी केल्यानंतर तो त्या गाड्यांना स्वतःच्या वाहनाचीच नंबर प्लेट लावून गुन्ह्याचा माग लपवण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून या चोरलेल्या दुचाकी वेगवेगळ्या व्यक्तींकडे गहाणवट ठेवून रोख रक्कम मिळवायचा. या गहाणवट ठेवलेल्या पैशांमधून तो गोव्यातील कॅसिनोमध्ये जाऊन जुगार खेळायचा आणि चैन करायचा, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा: Forest Crime: नागपूरचा फ्लॅट विकून मित्राला बिझनेससाठी दिले ६० लाख, अन् पुढे घडला भयानक प्रकार!

१६ मोपेड हस्तगत; पोलीस पथकाला २० हजारांचे बक्षीस

पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात आरोपीकडून एकूण १६ मोपेड जप्त करण्यात आल्या असून, यामध्ये १२ होंडा ॲक्टिव्हा आणि ४ सुझुकी बर्गमॅन दुचाकींचा समावेश आहे. आरोपीने शिवाजीनगर हद्दीतून ७, गावभाग हद्दीतून ५, शहापूर हद्दीतून १ आणि कोल्हापुरातील शाहूपुरी हद्दीतून १ अशा १४ दुचाकी चोरल्याचे उघड झाले असून, उर्वरित २ दुचाकींबाबतचा तपास सुरू आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या माहितीनुसार, ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक शरद मेमाणे, उपनिरीक्षक प्रवीण साणे, अनिल चव्हाण व पथकाने केली. या उत्कृष्ट तपासाबद्दल पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तपास पथकाला २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीची आणि आपल्या चैनीसाठी अशा पद्धतीने गुन्हा करणाऱ्या या फळ विक्रेत्या चोराची सध्या कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही दुचाकी चोरीची घटना कुठे घडली आणि आरोपी कोण आहे?

    Ans: इचलकरंजी शहरात ही घटना घडली असून, फळ विक्रेता प्रदीप बाळू मस्के (वय २४, रा. तारदाळ) याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

  • Que: आरोपी चोरीच्या दुचाकींचे काय करायचा?

    Ans: गोव्यातील कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी तो चोरलेल्या गाड्यांना स्वतःची नंबर प्लेट व बनावट कागदपत्रे लावून त्या इतरांकडे गहाण ठेवायचा

  • Que: पोलिसांनी या कारवाईत काय जप्त केले?

    Ans: पोलिसांनी आरोपीकडून ४ लाख २० हजार रुपये किमतीच्या १६ चोरीच्या मोपेड (१२ होंडा ॲक्टिव्हा व ४ सुझुकी बर्गमॅन) जप्त केल्या आहेत.

Web Title: Goa casino addiction ichalkaranji fruit seller bike theft mopeds seized sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • bike
  • Goa
  • In Kolhapur
  • Kolhapur District
  • Theft Case

संबंधित बातम्या

Theft Case: देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे बंद घर फोडून तब्बल १३ लाखांचा ऐवज लंपास; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी चक्क …
1

Theft Case: देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे बंद घर फोडून तब्बल १३ लाखांचा ऐवज लंपास; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी चक्क …

आधी दुचाकीवर लिफ्ट दिली, नंतर जंगलात दाखवली लुटारूंची भीती; वृद्ध महिलेचे दागिने घेऊन आरोपी फरार
2

आधी दुचाकीवर लिफ्ट दिली, नंतर जंगलात दाखवली लुटारूंची भीती; वृद्ध महिलेचे दागिने घेऊन आरोपी फरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.