आपल्या पैकी अनेकजण दररोज कार चालवत असतात किंवा गाडीतून प्रवास करत असतो. रोजच्या जीवनात आपल्या आजूबाजूला रस्त्यांवर अनेक प्रकारच्या चारचाकी गाड्या आपण पाहतो. या गाड्या पाहताना त्यांचा ब्रॅंड, कारचा रंग पाहतो. पण त्या प्रत्येक गाडीला विशेष अशी नंबर प्लेट असते. आणि काही गाड्यांची नंबर प्लेट ही वेगवेगळ्या रंगामध्ये असते. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री व राष्ट्रपती यांच्या गाड्यांच्या नंबर प्लेट वेगळ्या रंगाच्या असतात. आपण आज वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेटचा अर्थ जाणून घेणार आहोत.
पांढरा रंग : पांढऱ्या रंगाच्या कार या सामान्य भारतीय नागरिकांसाठी वापरण्यात येणाऱ्या कार असतात. भारतात आपल्याला ठिकठिकाणी पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेट असलेल्या कार दिसतात.
काळा रंग : काळ्या रंगाच्या कार या भाडेतत्त्वावर असणाऱ्या कार असतात. भाड्यावर असलेल्या गाड्यांची नंबर प्लेट ही काळा रंगाची असते. त्यामुळे आपल्याला अगदी रस्त्यावर देखील ही गाडी भाडेतत्त्वावर आहे हे लक्षात येऊ शकते.
हिरवा रंग : हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतिक आहे. त्यामुळे ज्या गाड्या या निसर्गपुरक असतात आणि प्रदुषण करत नाहीत अशा गाड्यांना हिरव्या रंगाची नंबर प्लेट लावण्यात येते. हिरव्या रंगाचे नंबर प्लेट असलेले वाहन खासकरुन इलेक्ट्रिक प्रणालीवर आधारित असते. अर्थात या गाड्यांना पेट्रोलची गरज नाही लागत. त्यामुळे इंधनाची बचतही होते. इलेक्ट्रिक वाहनांची आवड देशभरामध्ये वाढल्यामुळे आता सहज हिरवी नंबर प्लेट असणारे वाहन दिसून येते.
पिवळा रंग : वाहनाची नंबर प्लेट ही तिची ओळख सांगत असतो. जर एखाद्या वाहनाची नंबर प्लेट ही पिवळ्या रंगाची असेल तर ती गाडी कमर्शियल असते. अर्थात ही गाडी व्यावसायिक कामासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ रिक्षा किंवा टॅक्सी या गाड्यांच्या नंबर प्लेट या पिवळ्या रंगाच्या असतात.
निळा रंग : निळ्या रंगाची नंबर प्लेट असलेल्या कार या फॉरेन कार असतात. embassy मधल्या ज्या गाड्या असतात. त्या दूतावासची निगडीत जी लोकं असतात त्यांच्या गाड्यांचा नंबर प्लेटचा रंग हा निळा असतो. त्यामुळे नंबर प्लेटवरुन आतमध्ये बसलेली व्यक्ती दुसऱ्या देशातील असल्याचे लक्षात येते.
लाल रंग : काही वाहनांच्या नंबर प्लेट या लाल रंगाच्या असतात. लाल रंगाची नंबर प्लेट टेम्परोरी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट असतात. यांचा वापर काही महिन्यांसाठी केला जातो. अशा नंबर प्लेटच्या फार कमी गाड्या रस्त्यावर पाहायला मिळतात.
लाल रंग आणि त्यावर भारताचा अशोक स्तंभ : देशातील महत्वाचे मंत्री व भारत सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वेगळ्या रंगाची नंबर प्लेट असते. देशातील केंद्रीय मंत्री व देशाचे राष्ट्रपती यांच्या गाड्यांच्या नंबर प्लेट खास असतात. या गाड्यांच्या नंबर प्लेट लाल रंगाच्या असतात आणि त्यावर भारताचे चिन्ह अशोक स्तंभ असते. या गाड्या खास असतात आणि ही फार खासगी वाहनं असतात.
नंबर प्लेट आणि वरच्या दिशेने अॅरो असणाऱ्या कार : या कारची नंबर प्लेट असणाऱ्या कार या मिलिटरीच्या वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या कार असतात. याचा वापर सामान्य नागरिकांना करता येत नाही.