Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

High Security Number Plate अजूनही बसवली नाही? ‘या’ शहरात कारवाईला सुरुवात; दंड टाळण्यासाठी काय करावे?

ज्यांनी HSRP नंबर प्लेट अजूनही बसवली नाही, त्यांच्यावर आता RTO ने नवीन वर्षात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या कोणत्या कारवाईला सुरुवात झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 05, 2026 | 03:15 PM
High Security Number Plate अजूनही बसवली नाही?

High Security Number Plate अजूनही बसवली नाही?

Follow Us
Close
Follow Us:
  • RTO ॲक्शन मोडमध्ये!
  • HSRP नसणाऱ्या वाहनांवर कारवाईला सुरुवात
  • वाहधारकांनी काय करावे? जाणून घ्या
सरकारने अनेकदा मुदतवाढ देऊन सुद्धा कित्येक वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसवली नाही. ही नंबर प्लेट बसवणे सरकारने अनिवार्य केले होते. याचे कारण म्हणजे वाहनांच्या सुरक्षितेतेवर दिलेली भर. ही नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 होती. आता ज्यांनी अजूनही ही नंबर प्लेट बसवली नाही त्यांच्या नवीन वर्षात RTO ने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पहिली 31 मार्च 2025 होती. त्यानंतर ती 30 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली. त्यानंतर, 15 ऑगस्टपर्यंत नंबर प्लेट बदलण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर ही अंतिम मुदत 30 नोव्हेंबर आणि 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली. मात्र, आता नवीन वर्षात ही नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर कारवाई होताना दिसत आहे.

‘या’ ऑटोमॅटिक कारसाठी फक्त 2 लाख रुपये भरा आणि थेट घरपोच डिलिव्हरी मिळवा! जाणून घ्या EMI चे गणित

कारवाई सुरु

RTO आणि वाहतूक पोलिसांनी फॅन्सी, अनधिकृत किंवा स्टायलिश नंबर प्लेट जसे की दादा, भाऊ, राजे अशा शब्दांच्या नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व जुन्या वाहनांना High Security Registration Plate (HSRP) बसवणे केंद्र व राज्य सरकारने अनिवार्य केले होते. वाहनांची सुरक्षितता आणि चोरीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, या नंबर प्लेट्सवर विशेष लेझर कोड आणि युनिक ओळख क्रमांक असतो. मात्र, सरकारकडून वारंवार मुदतवाढ देण्यात येऊनही मोठ्या प्रमाणात वाहनधारकांनी अद्यापही या नियमाचे पालन केलेले नाही.

कधी आणि कुठे कारवाई सुरू?

नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यभर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. चौकाचौकांत, प्रमुख रस्त्यांवर तसेच राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाहतूक पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

20 kmpl मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 5.76 लाख रुपये! ‘ही’ SUV म्हणजे कहरच

किती दंड द्यावा लागणार?

सुरुवातीला, ही रक्कम 1000 रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, जर तुम्ही पुन्हा उल्लंघन केले तर हा दंड 5000 ते 10000 रुपयांपर्यंत असू शकतो. यासोबतच, ज्या वाहनांवर High Security Registration Plate (HSRP) अद्याप बसवलेली नसेल, अशा वाहनांशी संबंधित आरटीओची महत्त्वाची कामे जसे मालकी हस्तांतरण, वाहन पासिंग तसेच फिटनेस प्रमाणपत्र तात्पुरती थांबवले जाणार.

कारवाई टाळण्यासाठी काय करावे?

ही कारवाई टाळण्यासाठी, चालकांनी राज्य परिवहन विभागाच्या अधिकृत वेब पोर्टल,transport.maharashtra.gov.in वर रजिस्ट्रेशन करावे आणि तेथे योग्य पैसे द्यावेत. जर पावती वाहतूक पोलिसांना दाखवली तर वाहन मालकावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

 

Web Title: Maharashtra rto action against vehcles who not installed high security number plate how to avoid fine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • HSRP
  • HSRP Plate
  • Maharashtra Governement
  • Vehicle Number Plate

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.