फोटो सौजन्य: iStock
नवं वर्ष सुरु होण्यासाठी अवघे 2 महिनेच शिल्लक आहेत. नवं वर्षाचा जल्लोष नेहमीच सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. अनेक जण डिसेंबर आणि नोव्हेंबरच्या अखेरीस नवीन कार विकत घेताना दिसतात. तर काही जण आपली जून कार विऊकायला काढतात. जर तुम्ही सुद्धा या वर्षाअखेरीस नवीन कार घेण्याचा किंवा जुनी कार विकण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच लिहली आहे.
Maruti Dzire 2024 विकत घेतल्यास किती असेल EMI जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
नवीन वर्ष येणार आहे आणि त्यानिमित्ताने अनेकजण आपल्या आयुष्यात नवीन गोष्टींचा समावेश करताना दिसतात. यापैकी बरेच लोक नवीन वर्षात त्यांची कार अपग्रेड करण्याचा विचार करतात. जर तुम्ही तुमची जुनी कार विकून नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी किफायतशीर ठरू शकते. आज आपण जाणून घेऊया, वर्षाच्या शेवटी नवीन कार घेण्याचे 5 मोठे फायदे काय आहोत.
नवीन वर्षात नवीन कार्स शोरूममध्ये याव्यात यासाठी वर्षाच्या शेवटी ऑटो डीलर्स जुन्या कार्सना जास्तीतजास्त प्रमाणात विकताना दिसतात. अशा परिस्थितीत, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डीलर्स विशेष ऑफर आणि सवलती घेऊन येतात. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीची कार परवडणाऱ्या बजेटमध्ये मिळू शकते.
अनेकदा वर्षाच्या शेवटी अनेक कंपनीज आपल्या नवीन कार्स लाँच करतात. या कार्समध्ये प्रगत तंत्रज्ञान, सेफ्टी फीचर्स आणि उत्तम इंधन कार्यक्षमता असते. नवीन कारमध्ये अपग्रेड करून, तुम्ही लेटेस्ट फीचर्स मिळवू शकता, ज्यामुळे तुमचे ड्रायव्हिंग आणखी सुरक्षित आणि अधिक मजेदार होईल.
KTM कडून ‘या’ सुपरबाईकचे भारतात लॉंचिग, किंमत एकदा वाचाच
नवीन वर्षाच्या निमित्ताने डीलर्स वाहनांवर ऑफर्ससह मोफत ॲक्सेसरीज देखील देतात. ज्याची किंमत हजारोंमध्ये असते. वर्षाच्या शेवटी तुम्ही नवीन कार खरेदी केल्यास तुम्हालाही हा फायदा मिळू शकतो.
तुम्ही तुमची सध्याची कार विकून नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर वर्षाच्या शेवटी असे केल्याने तुम्हाला अधिक फायदे मिळू शकतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कारचे रिसेल व्हॅल्यू कमी होण्याची शक्यता असते, कारण अनेकदा कारची किंमत तिला कोणत्या वर्षात खरेदी केले आहे यावर आधारित असते.
तुमच्या जुन्या कारला वारंवार दुरुस्तीची आवश्यकता असल्यास, तुमची कार अपग्रेड केल्याने तुमचा पैसा आणि वेळ दोन्हीची बचत होऊ शकते. यामुळे नवीन कारमध्ये तुम्हाला कमी त्रास होऊ शकतो. अनेकदा कार वॉरंटी असते, ज्यामध्ये सर्व्हिस खर्च समाविष्ट असतो.