• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Ktm Launched Several Superbikes In India Including The 1390 Super Duke R

KTM कडून ‘या’ सुपरबाईकचे भारतात लॉंचिग; किंमत 22 .96 लाख रुपये

केटीएम (KTM) या अग्रेसर टू व्हीलर्स कंपनीनेही आज त्यांची एक स्पेशल सुपरबाईक भारतात लॉंच केली आहे ज्याची किंमत ही 22.96 लाख रुपये आहे. जाणून घेऊया बाईकबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Nov 15, 2024 | 09:31 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सणासुदीच्या काळ हा बाईक उत्पादक कंपन्यांसाठी विक्रीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा काळ असल्याने त्याकाळात प्रत्येक कंपन्यांकडून नवनवीन दुचाकी वाहने लॉंच करण्यात आली. प्रामुख्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतीच्या  विशेष ऑफर्सही याकाळात कंपन्यांकडून दिल्या गेल्या होत्या. आता वर्षअखेरच्या दीड महिन्यात विक्री वाढवण्याचा प्रयत्न उत्पादकांकडून केला जातोच शिवाय याकाळात नवीन उत्पादन लॉंच होण्याचे प्रमाण कमी असल्याने याचा फायदा करुन घेण्यासाठी काही प्रमुख कंपन्या  नवीन उत्पादनही लॉंच करतात. दरम्यान,  केटीएम (KTM) या अग्रेसर टू व्हीलर्स कंपनीनेही आज त्यांच्या सुपरबाईक्स भारतात लॉंच केल्या आहे. जाणून घेऊया याबद्दल

KTM ने भारतात 1390 Super Duke R सह अनेक सुपरबाइक लॉंच केल्या आहेत. KTM 1390 Super Duke R ची एक्स शोरुम किंमत 22.96 लाख रुपये आहे आणि ती डुकाटी स्ट्रीटफाइटर V4 ची मोठी स्पर्धक ठरणार आहे. ही बाईक केटीएम 1290 सुपर ड्यूकची उत्तराधिकारी ठरणार आहे .

इलेक्ट्रॉनिक्स आणि डिझाइन

बाईकमध्ये प्रगत ट्रॅक्शन कंट्रोल, लॉन्च कंट्रोल, व्हीली कंट्रोल आणि द्वि-दिशात्मक क्विकशिफ्टर यासह अनेक राइड मोड्स समाविष्ट आहेत. एक ब्लूटूथ-सक्षम TFT स्क्रीन आहे जी सर्व वैशिष्ट्ये नियंत्रित करण्यासाठी वापरली जाऊ शकते. कंपनी मोटरसायकलवर ‘डेमो मोड’ ऑफर करते. डेमो मोडचा उद्देश रायडर्सना काही फंक्शन्ससह ऑफर करणे आहे जे पहिल्या 1500km मध्ये वापरता येतील. वापरकर्ते डीलरशिपवर फीचर्स निवडल्यास ते कायमस्वरूपी अनलॉक करू शकतात. डिझाईनच्या बाबतीत, KTM 1390 Super Duke R ला मस्क्यूलर आणि आक्रमक डिझाइन मिळते.

बाईकचे इंजिन, ब्रेक आणि सस्पेंशन

KTM 1390 Super Duke R मध्ये 1350cc, LC8, V-ट्विन इंजिन आहे जे 190hp @10,000rpm आणि 145Nm @8000rpm निर्मिती करते. सस्पेंशनच्या बाबतीत, मोटरसायकलला पुढील बाजूस WP USD फोर्क आणि मागील बाजूस WP मोनोशॉक मिळत आहे. ब्रेक्सबदद्ल विचार केल्यास, 320mm डिस्कचे पेअर समोरच्या बाजूस असून  240mm डिस्क मागील बाजूस दिली जाते.

बाईकचे  टायर, वजन

KTM 1390 Super Duke R ला 17-इंच चाकांवर Michelin Power GP टायर मिळतात. इंधन टाकीची क्षमता 17.5 लीटर आहे. बाईकचे इंधनशिवाय वजन हे  200.5 किलो आहे. पॉवर-टू-वेट रेशो 1:1 आहे. केटीएमच्या इतर बाईक्स प्रमाणे या बाईकचे वजन जास्त आहे त्यामुळे वेगाने चालवताना बाईक ही स्थिर राहते.

केटीएमच्या अनेक सुपरबाईक्सची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. बाईकचा आकर्षक लूक हा तरुणांना जास्त भावतो.  त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात केटीएमच्या बाईक्सची मागणी असते. त्यामुळे कंपनी भारतीय बाजारपेठेवर विशेष लक्ष देत आहे. आता केटीएम 1390 लॉंचिगमुळे कंपनीने भारतीय ग्राहकांना नवीन पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. तसेच देशातील केटीएमच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांसाठीही ही बाईक एक आव्हान उभ करणार आहे.

Web Title: Ktm launched several superbikes in india including the 1390 super duke r

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 09:31 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

ENG W vs SA W : इंग्लड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसमाने! कोणाच्या हाती लागणार ICC Women’s Cricket World Cup 2025 चा पहिला विजय?

ENG W vs SA W : इंग्लड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसमाने! कोणाच्या हाती लागणार ICC Women’s Cricket World Cup 2025 चा पहिला विजय?

महिलांच्या ‘या’ सवयी बिघडवत आहेत हार्मोनल संतुलन, हेल्दी राहण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल

महिलांच्या ‘या’ सवयी बिघडवत आहेत हार्मोनल संतुलन, हेल्दी राहण्यासाठी आजच करा ‘हे’ बदल

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

Papankusha Ekadashi 2025: पापकुंश एकादशीच्या दिवशी वाचा ही कथा, तुमची सर्व अपूर्ण कामे होतील पूर्ण

Papankusha Ekadashi 2025: पापकुंश एकादशीच्या दिवशी वाचा ही कथा, तुमची सर्व अपूर्ण कामे होतील पूर्ण

तड़पाओगे तड़पा लो…! रामलीलामध्ये दिसला शूर्पणखेचा आधुनिक अंदाज, गाणं गाऊन लक्ष्मणाला केलं आकर्षित; मजेदार Video Viral

तड़पाओगे तड़पा लो…! रामलीलामध्ये दिसला शूर्पणखेचा आधुनिक अंदाज, गाणं गाऊन लक्ष्मणाला केलं आकर्षित; मजेदार Video Viral

What is E-Bond:आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

What is E-Bond:आजपासून कागदी बाँड हद्दपार तर नव्या E-Bondची एंट्री; राज्य सरकारचा मोठा निर्णय

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.