फोटो सौजन्य: Social Media
आपल्या स्वतःच्या कारमध्ये आपण आणि आपल्या कुटुंबाने कुठे तरी लांब फिरायला जावं, हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. यामुळेच कित्येक जण सणासुदीच्या काळात आपली हक्काची नवीन कार विकत घेत असतात. गेल्या काही वर्षांपासून भारतात कार्सची विक्री झपाट्याने वाढत आहे. यामागे अनेक कारणं आहेत त्यातीलच एक म्हणजे ईएमआय.
हल्ली ईएमआयमुळे अनेक जणांना कार घेणं शक्य झालं आहे. नुकतेच देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपनीने म्हणजेच मारुती सुझुकीने आपल्या लोकप्रिय डिझायरचे अपडेटेड व्हर्जन 11 नोव्हेंबरला मार्केटमध्ये लाँच केले आहे.
कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन जनरेशनची डिझायर ऑफर करण्यात आली आहे. जर तुम्ही या SUV चा टॉप व्हेरियंट ZXI+ घरी आणण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर, दरमहा किती रुपयांचा EMI तुम्हाला भरावा लागेल त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. पण त्याआधी या कारची किंमत जाणून घेऊया.
ZXI+ हे मारुतीने Dzire 2024 चे टॉप व्हेरियंट म्हणून ऑफर केले आहे. कंपनी या सेडान कारच्या टॉप व्हेरियंटचे मॅन्युअल व्हर्जन 9.69 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे.
जर ही कार राजधानी दिल्लीत खरेदी केली तर 9.69 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह, तुम्हाला त्यावर रजिस्ट्रेशन टॅक्स आणि आरटीओ देखील भरावा लागेल. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला आरटीओसाठी 67830 रुपये आणि इंश्युरन्ससाठी 48416 रुपये द्यावे लागतील. यानंतर या कारची ऑन रोड किंमत 1085246 रुपये होईल.
Skoda-Volkswagen ने ‘या’ मॉडेल्सच्या 52 कार्स बोलावल्या परत, जाणून घ्या कारण?
तुम्ही Maruti Dzire 2024 चा टॉप व्हेरियंट ZXI+ खरेदी केल्यास, बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स पुरवला जाईल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला सुमारे 885246 रुपयांची रक्कम बँकेकडून फायनान्स करावी लागेल. बँकेने तुम्हाला सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजासह 885246 रुपये दिले, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा केवळ 14243 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून नऊ टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 885246 रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 14243 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांमध्ये तुम्हाला मारुती डिझायर 2024 च्या ZXI+ व्हेरियंटसाठी सुमारे 3.11 लाख रुपये व्याज द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 13.96 लाख रुपये असेल.
मारुतीने कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन जनरेशन डिझायर आणली आहे. या सेगमेंटमध्ये, त्याची थेट स्पर्धा Hyundai Aura, Honda Amaze, Tata Tigor यांसारख्या कॉम्पॅक्ट सेडान कारशी आहे. याशिवाय काही प्रीमियम हॅचबॅक कार्सकडून किंमतीच्या बाबतीतही आव्हान असणार आहे.