बाईकच्या टाकीत किती वेळ पेट्रोल डिझेल राहू द्यावे (फोटो सौजन्य - iStock)
एकदा बाईक चालवल्यानंतर जर तुम्ही महिनोनमहिने जर बाईक चालवत नसाल, तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट माहीत असायला हवी. खरं तर, बाईकमध्ये असलेले इंधनदेखील खराब होऊ शकते आणि नंतर वापरण्यासाठी अयोग्य होऊ शकते असं म्हटलं जातं आणि यामध्ये किती तथ्य आहे हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही तुमची बाईक जुन्या इंधनाने चालवत असाल तर विश्वास ठेवा, त्यामुळे बाईकच्या इंजिनला गंभीर नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर तुम्हाला माहिती असायला हवी आणि तुम्ही त्यामुळे आपली बाईक अधिक काळ चांगल्या पद्धतीने जपू शकता (फोटो सौजन्य – iStock)
बाईकच्या टाकीतील पेट्रोल किती दिवस चालते?
जर बाईकची टाकी इंधनाने भरलेली असेल, तर तुम्ही बाईक सतत वापरत राहावी किंवा कमी इंधन भरावे. खरं तर, हवामानाचा बाइकच्या टाकीमध्ये असलेल्या इंधनावरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत, प्रतिक्रियेमुळे ते खराब होते.
बाईकच्या टाकीतील पेट्रोल एका आठवड्यापेक्षा किंवा १० दिवसांपेक्षा जास्त काळ भरलेले राहणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर पेट्रोल वापरले नाही तर माझ्यावर विश्वास ठेवा ते तुमच्या बाईकच्या इंजिनसाठी आणि त्याच्या कामगिरीसाठी खूप वाईट ठरू शकते.
Ola Roadster साठी 10 हजारांचे Down Payment केल्यास किती असेल EMI?
बाईकच्या फ्युएल टँकची क्षमता
बाईकमध्ये किती इंधन भरावे
वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार आणि बाईकची इंधन टाकीची क्षमता वेगवेगळी असते. काही वाहने २५ लिटर पेट्रोल-डिझेल क्षमतेची असतात तर काही वाहने ३५ लिटर पेट्रोल-डिझेल क्षमतेची असतात. काही बाईकमध्ये १० ते १८ लिटर पेट्रोलची क्षमतादेखील असते. अशा परिस्थितीत, अनेक वेळा पेट्रोल आणि डिझेल भरणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची जाणीव नसते. त्यामुळे ते जास्त पेट्रोल आणि डिझेल भरतात.
टाकी पूर्ण भरण्याचे नुकसान
करोडोंचं कार कलेक्शन असणाऱ्या Virat Kohli ची पहिली कार कोणती होती? स्वतःच केला खुलासा