फोटो सौजन्य: @OlaElectric (X.com)
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची डिमांड झपाट्याने वाढताना दिसत आहे. हीच वाढती डिमांड लक्षात घेता, अनेक ऑटो कंपन्या ज्या पूर्वी इंधनावर चालणाऱ्या कार ऑफर करीत होत्या. त्याच आज EVs च्या प्रोडक्शनवर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. मात्र, EVs ची क्रेझ वाढण्याअगोदरच एक अशी कंपनी आहे जी कित्येक वर्षांपूर्वी मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करत आहे. 2024 मध्ये कंपनीने बाईक सेगमेंटमध्ये देखील पाऊल ठेवत आपली पहिली ई-बाईक ऑफर केली होती.
जर तुम्ही दररोजच्या प्रवासासाठी चांगली बाईक शोधत असाल, तर Ola Roadster X Plus इलेक्ट्रिक बाईक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. ओलाच्या या पॉवरफुल बाईकची सुरुवातीची किंमत 1 लाख 35 हजार रुपये एक्स-शोरूम आहे. ओलाची ही बाईक उत्तम डिझाइन, पॉवरफुल फीचर्स आणि 500 किमी पेक्षा जास्त रेंजसह येते.
ABS आणि Non ABS मध्ये नेमका फरक काय, कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये मिळते सर्वात जास्त सेफ्टी?
जर तुम्ही ही ओला बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्यासाठी लोन देखील घेऊ शकता. ओला रोडस्टर एक्स प्लस बाईक फक्त 10,000 रुपयांच्या डाउन पेमेंटवर घरी आणता येते. चला या बाईकच्या डाउन पेमेंट आणि ईएमआयबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
राजफहानी दिल्लीमध्ये ओला रोडस्टर एक्स प्लस 4.5 किलोवॅट तासाच्या बॅटरी पॅक मॉडेलची ऑन-रोड किंमत 1 लाख 47 हजार रुपये आहे. जर तुम्ही ही बाईक खरेदी करण्यासाठी 10,000 रुपयांचे डाउन पेमेंट केले तर उर्वरित १ लाख 37 हजार रुपयांसाठी तुम्हाला बँकेकडून लोन घ्यावे लागेल. जर तुम्हाला 9 टक्के वार्षिक व्याजदराने लोन मिळाले तर तुम्हाला 3 वर्षांसाठी सुमारे 5000 रुपये ईएमआय भरावा लागेल.
मार्केटमध्ये आलिशान Volkswagen Golf GTI लाँच, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बरंच काही
ओला रोडस्टर एक्स प्लस इलेक्ट्रिक 2 बॅटरी पॅकसह लाँच करण्यात आली आहे. यामध्ये 4.5 किलोवॅट प्रति तास आणि 9.1 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅकचा समावेश आहे. बाईकला 11 किलोवॅट पीक पॉवर असलेली मोटर मिळते. ही बाईक 2.7 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा स्पीड गाठते. कंपनीचा दावा आहे की ही बाईक मोठ्या बॅटरी पॅकसह 501 किमीची रेंज ऑफर करते.