फोटो सौजन्य: iStock
भारतात बजेट फ्रेंडली Bike ला नेहमीच चांगली मागणी मिळताना दिसते. मात्र, असे जरी असले तरी हाय परफॉर्मन्स बाईकची एक वेगळीच क्रेझ सगळीकडे पाहायला मिळते. आजही रस्त्यांवरून एखादी हाय परफॉर्मन्स सुपर बाईक धावताना दिसली की अनेकांच्या नजरा त्यावर रोखल्या जातात.
भारतात काही कंपन्यांना तर त्यांच्या सुपर बाईकसाठीच ओळखल्या जातात. अशीच एक कंपनी म्हणजे Ducati. नुकतेच या कंपनीने आपल्या दोन बाईकसाठी Recall जाहीर केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
सुपरबाईक उत्पादक डुकाटी भारतीय बाजारात विक्रीसाठी विविध प्रकारच्या बाईक उपलब्ध करून देते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने ऑफर केलेल्या दोन बाईक्सच्या अनेक युनिट्ससाठी रिकॉल जाहीर केले आहेत. नेमकं या दोन बाईकमध्ये कोणती खराबी आली आहे त्याबद्दल जाणून घेऊयात.
Maruti Suzuki Victoris चा बेस व्हेरिएंटची चावी हातात मिळवण्यासाठी किती करावे Down Payment?
डुकाटीने त्यांच्या दोन बाईक्सच्या अनेक युनिट्ससाठी रिकॉल जारी केले आहे. अहवाल दर्शवितात की सुमारे 393 युनिट्स रिकॉल करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये Ducati Panigale V4 आणि Streetfighter V4 यांचा समावेश आहे.
रिपोर्टनुसार डुकाटीच्या दोन मॉडेल्सच्या एकूण 393 युनिट्समध्ये रिअर ॲक्सल फेल होण्याची शक्यता असल्याने हा रिकॉल जारी करण्यात आला आहे. हा रिकॉल जागतिक स्तरावर लागू करण्यात आला आहे, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे. संबंधित युनिट्स 2018 ते 2024 दरम्यान तयार करण्यात आल्या आहेत.
2023 मध्ये डुकाटीच्या एका बाईकसोबत अशी घटना घडली होती, ज्यामध्ये चालवताना रिअर ॲक्सल तुटला होता. मात्र, या अपघातात बाईकचा चाक वेगळा झाला नव्हते. या घटनेनंतरच कंपनीने जागतिक स्तरावर हा रिकॉल जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ अमेरिकेत सुमारे 10 हजार तर जर्मनीमध्ये सुमारे 7 हजार युनिट्ससाठी हा रिकॉल लागू करण्यात आला आहे.
कंपनी प्रभावित युनिट्सची तपासणी करेल. त्यानंतर, आवश्यक असल्यास मागील एक्सलशी जोडलेले पार्ट बदलले जातील. यासाठी कंपनी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारणार नाही.
भारतात या दोन Ducati बाईक ज्यांच्याकडे आहेत त्यांना कंपनी ईमेल आणि फोनद्वारे सूचित करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या बाईक जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जावे लागेल जिथे त्यांची टेस्टिंग केली जाईल आणि खराब झालेले पार्ट बदलले जातील.